देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गाथा

सावध शुक्रवार, ०४ डिसेंबर २००९, २०:२९ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

पूर्वीच्या ब्लॉगमध्ये व्यवस्थापनाच्या पद्धती सुधारण्याबद्दल अनेक उल्लेख आले आहेत. पण काल एक विचार करायला लावणारे वाक्य वाचनात आले.

ते वाक्य असे -आपल्या दैनंदीन व्यवहारात एखादी चूक नजरेस आली तर ९० टक्के प्रसंगात त्या क्षणी काहीही करता येत नाही.

मग फक्त त्या चुकीतून शिकायचा निश्चय करून काही वेगळी पावले उचलायला लागतात.

जेव्हा आपल्याला गाडी पकडायला उशीर झाल्याचे ...

किर्तन सोमवार, २३ नोव्हेंबर २००९, २०:०३ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

सध्या जरा गंभीर विषयांचे वाचन व श्रवण चालू आहे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे श्रवण करणार्‍यांनी किर्तन करणे अपेक्षित आहे. किर्तन करायला आवश्यक दहा कलांची पण समर्थांनी व्याख्या केली आहे. त्यात संगीत, अभिनय व पदन्यास यांचा समावेश होतो. ब्लॉगवरचे किर्तन सोपे पडते. असो.

काम कमी झाल्यावर भगवदगीता वाचायला लागलो आणि वाचाच बंद पडायची वेळ आली. जितके वेळा वाचू त्या प्रत्येक वेळेला ...

लढाईतील सहकार्य शनिवार, २६ सप्टेंबर २००९, १२:४९ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

सर्वांनी मिळून एका विशिष्ट ध्येयासाठी काम केले तर काही साध्य होऊ शकते. हा विषय मी अनेकदा पूर्वी मांडला आहेच. त्याचा एक नवा पैलू.

युद्ध करताना सुद्धा या प्रकारे काम करणे आवश्यक ठरते. पूर्वीपासून युद्धाचे पण काही नियम तयार झाले. व त्यानुसार लढताना दोन्ही पक्ष एका अलिखित व्यवस्थेचे घटक ठरले हे विलक्षण नाही कां? त्यामूळेच कदाचित पूर्वी झालेली युद्धे निर्णायक व ...

राजकारण गुरुवार, १७ सप्टेंबर २००९, २०:०७ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

नेत्यांनी कोणाचे ऐकावे? हल्ली आजूबाजूला मतलबी लोकांचा वेढा पडलेला असताना जनमानसाकडे पुढार्‍यांचे लक्ष जातच नाही. राजकारणाचा धंदा झाला आहे हे जनता जाणते पण हे जाणणारे ’जाणते’ नेते आहेत कोठे ? निवडणूकींच्या निकालाकडे पाहताना आज - उद्याचे वर्तमानपत्र जपून ठेवून वाचले तर निखळ करमणूकीची खात्री देता येईल.

मतलबी चमच्यांनी सरकारवर दबाव टाकून बरीच धोरणे आपल्याला सुखदायक ...

प्रवृत्ती रविवार, १३ सप्टेंबर २००९, ०९:१२ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती स्वत:ची प्रकृती घेऊनच आलेली असते. त्या प्रकृतीला संस्कृतीकडे कसे वळवायचे हा समाजाचा प्रयत्न असला पाहिजे. विकृतीकडे वळायला फार सोपे असते म्हणे.

आपली साधारण समजूत असते की काही बाह्य लालूच दाखवून आपल्याला हव्या असलेल्या दिशेला व्यक्तींना कामाला लावून आपले उद्दिष्ट साध्य करून घ्यायचे. या तत्त्वावर आधारीत एक प्रकल्प मायक्रोसॉफ़्टने दहा ...

मोजमाप - भाग ३ शुक्रवार, ११ सप्टेंबर २००९, १३:२८ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

बायकांची मोजमापे हा विषय निघाला की सौंदर्यस्पर्धा व त्या अनुषंगाने परिचित आकडे ( figures) डोळ्यासमोर येतात नां? पण बाह्य स्वरूपावर जाऊ नये असे उगाच नाही म्हणत. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत ८०० मि शर्यत जिंकणारी महिला वेगळी ’मोजमापे’ वापरल्यावर पुरुष असल्याचे आढळून आले.

आता आपल्या पुरुष खासदारांना महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यास अजून एक मुद्दा मिळणार ...

उत्कटता बुधवार, ०२ सप्टेंबर २००९, २०:२५ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

एखादी गोष्ट मस्त जमावी असे वाटत असेल तर त्यात उत्कटतेची भावना असली पाहिजे. एकदा हातातल्या कामावर प्रेम जडले की दर्जा कसा सुधारतो याचा अनुभव अनेकदा आला आहे. जणू काही श्री आपल्या हातून अवघड काम करवुन घेत आहे असेच वाटते.

खरं म्हणजे कामावर प्रेम बसले की काम व्यवस्थित होण्यासाठी जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती आपण घेतो. समजा घरी मोठा जेवणाचा बेत आहे आणि प्रिय व्यक्ती जमणार आहेत ...

श्रद्धा मंगळवार, ०१ सप्टेंबर २००९, २१:२१ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

गेल्या ब्लॉगमध्ये साधनेत श्रद्धा हवी असे मोघम लिहून सोडून दिले होते. खरे तर पहिले प्रथम नविन गोष्ट शिकण्यासाठी काही हवे असेल तर श्रद्धा. गुरुवर श्रद्धा पाहिजे. गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाचा मान राखला पाहिजे. हल्ली एक अनुभव येतोच येतो. एखाद्या समूहापुढे बोलायचा प्रसंग आला की त्यात काही महाभाग असे निघतात जे वक्त्याची चाचपणी करायला आले असतात. म्हणजे आपल्याला सभेतल्या विषयाचे ...

शोध शुक्रवार, २८ ऑगस्ट २००९, २०:४२ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

आमचे एक गुरू आहेत मनुष्यबळ विकास क्षेत्रात काम करणारे. त्यांनी एकदा बोलता बोलता नजरेस आणून दिले की आपण आपल्या मुलांना कसे वाढवतो हे आपल्याला कसे वाढवले गेले यावर अवलंबून असते. जर आपल्या लहानपणी आपल्याकडे अती लक्ष दिले गेले असेल तर आपण आपल्या मुलांना उनाडू देतो .पण या उलट जर आपल्या लहानपणी आपण मन मानेल ...

तिचे अभंग, तिची गाथा ! मंगळवार, १४ जुलै २००९, ०८:१३ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipediaसकाळी उठावे | सुसाट सुटावे |ऑफिस गाठावे | कैसेतरी ||इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||चढावे बशीत | गर्दीत घुशीत |रोज या मुशीत | कुटताना ||धक्के ते ...