भडकलेली आग कधीतरी शांत होतेच
धीर धर मित्रा, रात्रीनंतर पहाट होतेच
कधी रात्र मोठी, मध्यरात्रीनंतरही लांबलेली
उशीराने होणारी पहाट, काळजात दाटलेली
ढगाला सारून दूर, सुर्यबिंब वर येतेच
धीर ...
भडकलेली आग कधीतरी शांत होतेच
धीर धर मित्रा, रात्रीनंतर पहाट होतेच
कधी रात्र मोठी, मध्यरात्रीनंतरही लांबलेली
उशीराने होणारी पहाट, काळजात दाटलेली
ढगाला सारून दूर, सुर्यबिंब वर येतेच
धीर ...
तूझ्या पाखरांना कुणाचा दिलासा?
कुणी ना उसासा टाकतसे
कुणी खेद खंती नसे डुंबलेला
आनंद सोहळा होत असे
असे पर्ण संभार ज्यांच्या कपाळी
तयांना जीवन मिळते ...
औरंगाबाद शहर पुर्वीच्या मुघल साम्राजाचा एक भाग, औरंगजेब बादशाहा होण्याआधी जेव्हा या प्रांताचा सुभेदार होता तेव्हाच त्याने खडकी हे या शहराचं नाव बदलून ' औरंगाबाद ' ठेवलं. तर अशा या औरंगाबाद मधून निघालं आणि पुढे दिल्ली दरवाजा मधून बाहेर पडलं की १०२ कि. मी. अंतरावर अजिंठा लेणी आहेत.
औरंगाबादहून निघाल्यावर वाटेत दोन्ही बाजूला दूरवर पसरलेली ऊस, कापूस, गहू, ज्वारी, ...
आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. पत्थरसाहेब गुरूद्वारा, मॅग्नेटीक हिल, सिंधु आणि झंस्कारचा संगम, आल्ची हि लडाखमधील प्राचीन गुंफा याना भेट देत आम्ही जेव्हा मूनलँडवर पोहोचलो, तेव्हा पुन्हा एकदा कॅमेरे सुरूच राहीले. चंद्रभूमिला स्पर्श केल्याच्या जोशात आम्ही नमकिला पास पार करून कारगिल केव्हा गाठलं ते समजलच नाही. आता माणसांची चेहरेपट्टी, वागणं बदललं होतं. ...
एव्हाना संपुर्ण ग्रुप एकत्र आला होता. मैत्री तर कधीच झाली होती. आज आम्ही डिस्कीट या छोट्याशा गावातच रहायला होतो. रात्री कँम्प फायर झालं, आज सगळ्यानाच कंठ फुटले होते. दोन वाजून गेल्यावर आम्ही झोपेच्या
स्वाधीन झालो. सकाळी जाग आली तर बाहेर पाऊस पडत होता. डिस्कीट गुंफेला भेट देऊन परतीच्या प्रवासास सुरवात केली. आज खारडुंगलाचं रुप पालटलं होतं. बर्फवृष्टी होत होती. आता ...
आज आम्ही नुब्रा व्हॉलीकडे प्रयाण करत होतो. पण त्याआधी आणखी एक मुख्य आकर्षण होतं ते खारदुंगला पासचं - जगातील सर्वात उंच मोटारवाहतुकीचा रस्ता तेथूनच जातो. १६३६० फूट उंचीवर आम्ही पोहोचलो स्वर्ग दोन बोटच उर्ला होता. भारताचा तिरंगा फडकवतच आम्ही ग्रुप फोटो काढला . सैनिकांशी नेहमीप्रमाणे हितगुज करुन आम्ही डिस्कीटच्या दिशेने निघालो. इथे निसर्गाचं आणखी
एक वेगळं ...
पुढचं प्रमुख आकर्षण होतं पँगगॉंग लेक. १४५ कि.मी. लांबीचं हे तळं (?) खार्या पाण्याचं आहे. भारत-चीन सीमेवरील या ठिकाणी जाताना नयनरम्य अशा प्रदेशातून आपली भ्रमंती होते. वाटेत लागतो छांगला पास. रस्त्यात याक, मरमऑट असे प्राणी दिसले.
आता पासेसना सरावलेले आम्ही कारु, शक्ती शक्ती अशी गावं पार करुन पँगगॉंग ला पोहोचलो. वाटेतलं बर्फ आता रोजचं झालं होतं. पण पासवर पोहोचल्यावर ...
हिमालयाची शुभ्र हिमशिखरं सर्वानाच साद घालत असतात, नव्हे अगदी वेद काळापासूनच आपणा सर्व भारतीयाना त्याच प्रचंड आकर्षण आहे. जसे देव, ऋषी- मुनी तिथे वास्तव्य करतात असं आपण मानतो, तसाच निसर्ग देवतेचा नित्यनेमाने नवा अविष्कार आपल्याला तिथे पहायला मिळतो. आपल्या देशाला पुर्वेकडे अरुणाचल प्रदेश पासून उत्तरेकडे काश्मिर पर्यंत हे देणं लाभलं आहे. जगभरातील निसर्गवेडे इथे धाव घेत ...
आज आम्ही लेहमध्येच फिरणार होतो. सिंधू नदी ( Indus) कित्येक वर्षे फक्त वर्णनातून ऎकलेली, वाचलेली आज प्रत्यक्ष समोर होती. घाटावर जाऊन पाण्याला स्पर्श केला. शांत, थंड जल, काठाला थोडीशीच हिरवाई.
भावनांनी मनात गर्दी केलेली. उत्तर-पुर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पुर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभा ट्रांस हिमालयन रांगांचा, अशा प्रदेशात आता आमचा संचार
सुरू होता. ...
आम्ही लडाखमध्ये प्रवेश करत होतो. सभोवतालचं जगचं बदलून गेलं होतं. मातीचा रंग, ढगांचे आकार, आकाशाची निळाई सर्वच नेहमी पेक्षा वेगळं. सगळीकडे फक्त रंगांचीच उधळण. काय पाहू काय नको, कशाकशाचे म्हणून फोटो काढायचे ? आता थांबायचं नाही असं अनेकदा ठरवून आम्ही थांबतच गेलो. रांगोळीचे रंग कमी वटावेत असे मातीचे रंग, असंख्य छटा आणि आकार पुर्ण कॅनव्हासच निसर्गाने रांगोळीने भरुन टाकला ...