माझ्या रूममेटकडून मला स्वयंपाकातल्या चार गोष्टी शिकायला मिळतायत. तसंच इकडे कुठे काय काय मिळू शकेल हेही कळतंय. परवाच मार्केटमधून डोशाचं तयार पीठ आणलं होतं. आज ते डोसे करून पाहिले. ज्या पॅनमधे डोसे केले तो पॅन छोटा आणि गोलाकार होता त्यामुळे डोशांना गोल होण्यावाचून काही पर्यायच नव्हता. पिठात थाई मिरच्यांची ‘कस्टम अॅडिशन’ केली होती. एवढ्याश्या या चिमुरड्या मिरच्यांना ऐश्शपत ...