देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मजा

आपण मराठी लोक सोमवार, २६ जुलै २०१०, १२:०१ (+०५:३०)

manimanasi मनी मानसी

 आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे.सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली.

काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो. मला त्या कार्यक्रमाविषयी काही लिहायचे नाही आहे .एखादी कॉन्सर्ट जशी मस्त रंगते तशीच रंगली.

 गाण्याच्या मध्येमध्ये निवेदक काही न काही गंमत करून वेळ भरून काढतात ना तसा तो निवेदक आला आणि ...

माझा अनोखा प्रयोग सोमवार, ११ जानेवारी २०१०, १९:५६ (+०५:३०)

कवडसा

"दुनिया गोल आहे" असं म्हटलं जातं. खरं तर त्यातला मतितार्थ भौगोलिक जास्त, आणि त्या खालोखाल योगा-योगाचा.
कुठंतरी मगाशी हेच वाक्य वाचलं आणि माझ्या डोक्यात हा किडा वळवळायला लागला. (तसा एरवी गाढ झोपलेलाच असतो हा किडा.)
मी विचार केला, ही दुनिया पैशाच्या बाबतीत पण तितकीच गोल आहे का? पैसे सुद्धा असेच फिरुन आपल्याला परत मिळु शकतात का??

म्हणुन मग मी एक छोटासा प्रयोग करायचं ठरवलंय. याचा ...

शरीरांच्या कविता- कारणं रविवार, २७ डिसेंबर २००९, ००:२५ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

कारणं

शरीराला कारणं लागतात
justifications लागतात
ती परत वेगळी कळावी लागतात
खोलवर पोचावी लागतात

वेगवेगळी कारणं मिळत असली
की मजा येते, दोन्ही शरीरांना
मग त्रुटी लक्षात रहात नाहीत
सुख तेवढं पोचतं खोलवर

नको तिथे नको तेवढी
चरबी, मेद किंवा तत्सम ...

जळगावची सफर - पद्मालय शुक्रवार, २७ नोव्हेंबर २००९, ०८:२४ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

नमस्कार मित्रहो, तर याआधीच्या "दिवाळीनंतरची ट्रेक..." मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही (म्हणजे मी अन गौरव) दोघांनी "पद्मालय"ला जायची तयारी केली. त्या दिवशी माझ्या धाकट्या मावसबहिणीकडे गोड-धोड जेवण करून ...

थंडी बुधवार, २५ नोव्हेंबर २००९, ००:३५ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

रविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप दिवसांनी नैसर्गिक थंडी जाणवली. वडील नेहमी सांगतात ...

दिवाळीनंतरची ट्रेक... शनिवार, ०७ नोव्हेंबर २००९, १०:५९ (+०५:३०)

╚» विशाल तेलंग्रे «╝ सुरूवात...

सन २००९ म्हणजे ह्या वर्षाची दिवाळी एवढी कंटाळवाणी गेली ना की बस्स....! एवढा बोअर मी कधीच झालो नव्हतो. दिवाळी अन भाऊबीजला माझ्या मामांच्या मुलाला (गौरवला) घरी बोलवून घेतले. पण तो घरी आल्यावर पण काही ...

मला त्यांनी असं सांगितलं होतं…! सोमवार, २१ सप्टेंबर २००९, १०:२८ (+०५:३०)

╚विशाल╝ कळत नकळत

मला इ-मेल द्वारे मिळालेली एक मजेशीर आणि उपदेशपर गोष्ट:

एकदा एका मोठ्या खोलीत छताला काही फळे टांगून ठेवण्यात आली. त्यानंतर फळांपर्यंत पोहोचणारी एक शिडी तेथे ठेऊन त्या शिडीतून वीजेचा प्रवाह सोडण्यात आला. त्या खोलीत नंतर पाच माकडे आणली गेली व त्यांना तेथेच सोडून देण्यात आले.

भूक लागल्यामुळे माकड जेव्हा फळे खायला जात आणि शिडीला त्यांचा स्पर्श होताच त्यांना वीजेचा ...

जादुचे दिवस मंगळवार, ०२ जून २००९, १२:४० (+०५:३०)

chandrashekhara अक्षरधूळ

एकोणिसशे  पन्नासच्या सुमारास,  पुणे  म्हणजे जवळपास,   थोडेफार  सुधारलेले असे एक खेडेगावच होते..  बहुतेक  ठिकाणी,  कधी  काळी डांबरीकरण केलेले व आता पूर्णपणे दुर्दशा झालेले खड्डेवजा रस्ते,  मिणमिणते  दिवे व रस्त्यावर मुख्यत्वे सायकली व टांगे यांची वर्दळ,  यामुळे  शहरीकरणाचे वारे फारसे कोठे दिसत नसत.   नाही  म्हणायला कसबा, रवीवार  वगैरे काही पेठा आणि मुख्यत्वेकरून ...

मजा. मंगळवार, १० मार्च २००९, २३:१६ (+०५:३०)

Green Planet मराठी म्हणी, वा...

चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात ...

६७ रविवार, ०८ मार्च २००९, १४:५७ (+०५:३०)

कवडसा

सकाळी उशीरा उठणं.. :happy: त्या आधीच जाग आलेली असते, तरी पण लोळत पडणं... :p

मग सावकाश, पेपर चाळत चाळत चहा पिणं... :coffee:

आरामात बसुन टि.व्ही. पाहणं... :whistle:

आंघोळीच्या पाण्याची बादली भरली की मग शिस्तीत आंघोळीला जाणं... ;)

सगळं उरकुन परत टि.व्ही. समोर बसुन भारत-न्युझीलंड क्रिकेट मॅच पहात बसणं..
सोबत "सही!!", "अरेरे...", "व्वा!!", "झक्कास!" असे काहीसे उद्गार काढत राहणं.. :up:

भारतानी उभारलेल्या ...