देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उत्साह

….लंगडी घालाया लागली. मंगळवार, २२ जून २०१०, १८:३८ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

पोस्टच नाव वाचुन ही पोस्ट ’कोंबडी पळाली’ हया गाण्यासंदर्भात आहे असा गैरसमज अजिबात करुन घेउ नका.तर ही पोस्ट परवा पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या सहल कम मीट ...

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया! शनिवार, १७ ऑक्टोबर २००९, ०६:४१ (+०५:३०)

कवडसा

लख-लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या...!

तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या तेजस्वी शुभेच्छा! :)

आज पासुन खरी दिवाळी सुरु झालीये. बऱ्याच जणांचं अभ्यंग स्नान झालेलं आहे, आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी ...

वेध सुर्यग्रहणाचे! मंगळवार, २१ जुलै २००९, १३:०० (+०५:३०)

कवडसा

उद्या - दि. २२ जुलै २००९ रोजी खग्रास सुर्यग्रहण होतंय. भारतातुन सुद्धा खग्रास अवस्था दिसणार आहे. मुळात, या सुर्यग्रहणाची सुरुवातच भारतापासुन होतेय यंदा! मी तर खुपच उत्साहीत झालेलो आहे हे ग्रहण पाहण्यासाठी. यंदाचं ग्रहण हे "ग्रस्तोदित ग्रहण" आहे. म्हणजे, सुर्य उगवतांनाच त्याला ग्रहण लागलेलं असणार आहे. जरी पावसाळ्याचे दिवस असले, आणि पाऊसही पडत असला तरी मी मात्र जय्यत तयारी करत आहे. ...

दारे झाली किती बंद शुक्रवार, १२ जून २००९, ०८:२० (+०५:३०)

Tushar Joshi, Nagpur तुषार जोशी, नागपूर

.

.
दारे झाली किती बंद
नाही मानली मी हार
आयुष्यात घेणे नाही
कधी माघार माघार
.
माझ्या वर चालू आले
रूढी कांडांचे वादळ
माझ्या नावेच्या पाठीशी
माझ्या तत्वांचेच बळ
माझ्या हुकुमात माझे
सारे विकार विकार
.
केला सातत्याचा बाण
घेत यशाचाच नेम
एकवटून डोळ्यात
आले माझे रोम रोम
यश चळ चळ कापे

सुस्वागतम मान्सुन!!!! शुक्रवार, ०५ जून २००९, १६:०९ (+०५:३०)

कवडसा

पहिल्या पावसाच्या शुभेच्छा!! :)

यंदाच्या वेळी मान्सुन अगदी वेळेआधीच दाखल झालाय. आपल्याला जशी पावसाची ओढ लागली होती, तशीच त्यालासुद्धा आपल्या मातीची लागली होती बहुतेक. त्यामुळं हा पठ्ठ्या वेळेआधीच आला!

मागे एकदा मान्सुन-पुर्व पावसाची सर येऊन गेली होती. जणु काही "मान्सुन येत आहे हो!!" अशी दवंडीच पिटुन गेलेली. गेल्या आठवड्यापासुन काळ्या ढगांनीसुद्धा ...

माझी वेबसाईट! गुरुवार, २८ मे २००९, १५:४९ (+०५:३०)

कवडसा कवडसा

आजपासुन माझी स्वतःची वेबसाईट सुरु झालीये!!   www.prabhasgupte.com असा पत्ता आहे.

कालच मी वेब सर्वर वर जागा विकत घेतली, डोमेन-नेमसुद्धा नोंदवलं आणि काल रात्रीतच संपुर्ण वेबसाईट पुर्ण केलीये. मग सर्वरवर अपलोड करुन चाचणी घेतली, कुठे काही गडबड नाहीये ना याची.

हि वेबसाईट सुरु करण्यामागे बरेच हेतु आहेत. या ब्लॉगवरुन माझं अस्तित्व तसं आहेच इंटरनेट वर, पण एक व्यावसायिक अस्तित्वसुद्धा आता तयार ...

माझी वेबसाईट! गुरुवार, २८ मे २००९, १४:५३ (+०५:३०)

कवडसा

आजपासुन माझी स्वतःची वेबसाईट सुरु झालीये!! :up: www.prabhasgupte.com असा पत्ता आहे.

कालच मी वेब सर्वर वर जागा विकत घेतली, डोमेन-नेमसुद्धा नोंदवलं आणि काल रात्रीतच संपुर्ण वेबसाईट पुर्ण केलीये. मग सर्वरवर अपलोड करुन चाचणी घेतली, कुठे काही गडबड नाहीये ना याची.

हि वेबसाईट सुरु करण्यामागे बरेच हेतु आहेत. या ब्लॉगवरुन माझं अस्तित्व तसं आहेच इंटरनेट वर, पण एक व्यावसायिक अस्तित्वसुद्धा आता ...

भरतचे ’आलु पराठे’ रविवार, १७ मे २००९, १५:४८ (+०५:३०)

कवडसा

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

माझे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग माझ्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. :) तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र ...

माझी कोल्ड कॉफी रविवार, १० मे २००९, १०:५१ (+०५:३०)

कवडसा

मी आत्ताच घरच्या घरी कोल्ड कॉफी बनवलीये. पहिलाच प्रयत्न माझा कोल्ड कॉफी बनवायचा.. पण १००% यशस्वी झालाय!
झक्कास बनलीये कोल्ड कॉफी.. अगदी त्या ’दुर्गा’वाल्यासारखीच. (फक्त त्यावर कोको पावडर नाही टाकलीये.)
सकाळपासुनच मी त्याच्या तयारीत होतो. कालच गुगलवरुन ’कोल्ड कॉफी कशी बनवायची’ याची रेसिपी शोधली होती.

आज सकाळी, कॉफीची पावडर उकळत्या ...

९४ शनिवार, ०४ एप्रिल २००९, ०८:४० (+०५:३०)

कवडसा

संपला!!! हुर्रे!!!!!!!!! ढिंगटांग ढिटॅंग ढिंगटांग टिटॅंग..!!

संपला बुवा तो आठवडा एकदाचा..कसला दगदगीचा होता तो!! कामाचे ताण.. त्यातुनच उष्णता.. वैताग आलेला नुसता. तसा ऑफिसमध्ये दिवसभर ए.सी.मध्येच असतो. पण त्यामुळंच मग बाहेर आलं की जरा जास्तीच गरम वाटायला लागतं. या गेल्या आठवड्यात तर तापमानानी चांगलीच उसळी मारली आहे. रात्री हवा वाहती असली तरी ती अशी गरमच येणार.. झोप लागत नाही ना मग, ...