देवनागरी
Roman
Press F12 to toggle

किस्सा

माउस पाहावे चोरून ! मंगळवार, २४ मे २०११, ०५:३९ (+०५:३०)

sanket मन वढाय वढाय....

अभियांत्रिकीला येणार्‍या सगळ्याच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असतेच असे नाही. काही दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कधी संगणक पाहिलादेखील नसतो. असाच एक दुर्गम भागातून आलेला मुलगा ...

रेशन ते स्टेशन मंगळवार, १८ जानेवारी २०११, १६:५८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझ्या घराजवळील सरकारी ‘रेशन’ दुकानाच्या दुकानदाराला पोलिसांनी मागील महिन्यात पकडले. आता तोच नाही तर पिंपरी चिंचवड मधील अजून दोन सरकारी ’रेशन’ दुकानदारांना पकडले आहे. ते तिघे ‘रेशन’वरील वस्तू रेशनकार्ड वाल्यांना न विकता बाहेर इतर दुकानदारांना विकायचे. परवा त्या निगडीच्या रेशनकार्डच्या ऑफिसच्या ‘महाराणी’ला पकडले. आता महाराणी यासाठी की तिचा रुबाब तसाच होता. आठवतो का मी ...

शास्त्रज्ञ शुक्रवार, ०६ ऑगस्ट २०१०, १४:३५ (+०५:३०)

यशवंत कुलकर्णी अथ यश उवाच Yashwant Kulkarni

मी ऐकलंय, एक शास्त्रज्ञ होता. मोठा शास्त्रज्ञ. विशेषकरून विद्युत-यंत्रांबाब त्याची विलक्षण क्षमता होती. तो आपल्या मोठ्या मुलीमुळं काळजीत होता. कारण एक मुलगा त्याच्या मुलीमागे लागला होता. जुन्या वळणाचा बाप असता तर त्यानं काठीनं मारून हाकलून दिलं असतं. पण तो जुन्या वळणाचा नव्हता, आधुनिक माणुस होता. पण आधुनिकता तर वरवरच राहाते ! अंतर्यामी तर जुनंच चालंत राहातं! तेव्हा ...

सगोत्र मंगळवार, २२ जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

नेहमीप्रमाणे या रविवारी वडिलांनी एक स्थळ पाहायला जायचे अस सांगितले होते. पण यावेळी वडिलांनी मला, मुलीला जे काही विचारायचे ते सर्वांसमोर विचारायाचे अस आदेश वजा सल्ला दिला होता. त्यांच्यासमोर काय बोलणार? मी नुसतीच मान डोलावली. आईला समजावून पाहिलं. पण काय फायदा झाला नाही. शनिवारी मित्राला भेटून रात्री घरी आलो तर वडील कोणाशी तरी फोनवर बोलत होते. आईने सांगितले की उद्या स्थळ ...

हिंदुत्व शुक्रवार, २६ मार्च २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

दोन दिवसांपूर्वी त्या याहूवर चाटींग वर एक ‘गे’ भेटला होता. अल्स विचारल्यावर त्याला म्हटलं ‘मी मुलगी नाही रे’. आणि कुठून म्हटलं अस करून टाकल. कसाबसा पिच्छा सोडवून घेतला. नाही तरी आता काय म्हणतात ‘कायदा’ केला आहे त्यांच्यासाठी. परवा आपल्या सर्वोच्य न्यायालयाने असंच आणखीन एक ‘लिव्हींग रिलेशनशिप’ला मान्यता दिली. माझ्या मागील कंपनीत एक ‘लिव्हिंग रिलेशनशिप’वाली होती. आता तीचा तो ...

किस्सा शनिवार, २० मार्च २०१०, १५:०५ (+०५:३०)

JaguarNac मुक्ताफळे

नवीन जागा, नवीन लोक, नवीन प्रदेश अशा परिस्थितीत बहुतेक माणूस जरा नेटका राहण्याचा आपोआपच प्रयत्न करत असावा. गेले काही महिने मी अत्यंत काळजीपूर्वक राहात होतो. घरून निघताना सर्व काही बंद आहे याची खात्री करणे, गोष्टी नजरेसमोर अथवा जागच्याजागी ठेवणे, आवश्यक गोष्टी जपून ठेवणे, किल्ल्या सांभाळणे वगैरे सुरळीत चाललं होतं.

आज संध्याकाळी मस्तपैकी 24 चा एक एपिसोड बघितला. त्यानंतर ...

माझा अनोखा प्रयोग सोमवार, ११ जानेवारी २०१०, १९:५६ (+०५:३०)

कवडसा

"दुनिया गोल आहे" असं म्हटलं जातं. खरं तर त्यातला मतितार्थ भौगोलिक जास्त, आणि त्या खालोखाल योगा-योगाचा.
कुठंतरी मगाशी हेच वाक्य वाचलं आणि माझ्या डोक्यात हा किडा वळवळायला लागला. (तसा एरवी गाढ झोपलेलाच असतो हा किडा.)
मी विचार केला, ही दुनिया पैशाच्या बाबतीत पण तितकीच गोल आहे का? पैसे सुद्धा असेच फिरुन आपल्याला परत मिळु शकतात का??

म्हणुन मग मी एक छोटासा प्रयोग करायचं ठरवलंय. याचा ...

चॉकलेटचा चलनी वापर गुरुवार, ३१ डिसेंबर २००९, ०८:४७ (+०५:३०)

कवडसा

काल मी काही कामासाठी कोल्हापुरला गेलो होतो. पुणे-बेंगलोर हाय-वे वर टोल भरावा लागतो.
आजकाल हे टोलवाले एक भलतीच हुशारी करतात. परत देण्याच्या सुट्ट्यापैशांऐवजी, ते चक्क तेवढी चॉकलेट्स देतात!

काल दोन ठिकाणी रु. ४६ टोल होता. दोन्ही ठिकाणी मी जातांना रु. ५० ची नोट दिलेली आणि दोन्ही ठिकाणी मला ४-४ चॉकलेट मिळाले होते परत.
कोल्हापुरात पोचल्यावर माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी ...

दंगा-मस्ती - क्रिकेटची... बुधवार, ०७ ऑक्टोबर २००९, ०७:४९ (+०५:३०)

कवडसा

काल भरतच्या रुमवर तो, धन्या आणि मी असं तिघं क्रिकेट खेळलो. :) कोणाचा तरी प्रोजेक्ट रिपोर्ट होता, ती आमची बॅट. आणि कागदाचा बोळा म्हणजे आमचा बॉल.. आणि आमचं क्रिकेट सुरु!! बऱ्याच दिवसांनी असं ’इन-डोअर क्रिकेट’ खेळलो! दंगामस्ती करत खेळलो आणि मी, भरत आणि धन्या - आम्ही तिघंही फ्लॅशबॅकमध्ये गेलो.

आम्ही जेव्हा बि.सी.एस.च्या तिसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा टिळे सरांच्या क्लासवर दुपारी असंच ...

भरतचे ’आलु पराठे’ रविवार, १७ मे २००९, १६:०४ (+०५:३०)

कवडसा कवडसा

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

माझे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग माझ्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र ...