देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गझल

मुकी असेल वाचा बुधवार, १६ मे २०१२, १०:१९ (+०५:३०)

मराठी गझल - Marathi Gazal

मुकी असेल वाचा 

कसा वाजवू टाळी, मी देऊ कशी दाद?
पहिला चेंडू छक्का, दुसर्‍या चेंडूत बाद

तुझे-माझे जमले कसे, करतो मी विचार
भाषा तुझी तहाची, मला लढायचा नाद

विसरभोळा असे मी सांगतो वारंवार
भूल पडते देणींची, घेणे असते याद

सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात
चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद

सुप्तनाते सोमवार, १४ मे २०१२, २३:०४ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

सुप्तनाते

तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
मला कुस्करावेस मर्जीप्रमाणे, शिरोधार्य आहे तुझी भावना

तुला जाण नाही, मला भान नाही, कसा चालणे सांग संसारगाढा
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, न पेक्षा बर्‍या मग खुल्या ...

कुंडलीने घात केला गुरुवार, १० मे २०१२, १०:४९ (+०५:३०)

मराठी गझल - Marathi Gazal

कुंडलीने घात केला

कसा कुंडलीने असा घात केला
दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला

असे वाटले की शिखर गाठतो मी
अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला

विचारात होतो अता झेप घ्यावी
तसा पाय मागे कुणी खेचलेला

खुली एकही का, इथे वाट नाही
हरेक पथ येथे कुणी हडपलेला?

पटू संसदेचा, तरी दांडगाई
म्हणू का नये रे तुला रानहेला?

दिशा दर्शवेना, मती ...

मावळायचे..... सोमवार, ०७ मे २०१२, १९:५४ (+०५:३०)

क्रांति अग्निसखा

जरा पुढे वळायचे,
वळून मावळायचे

तुला उजेड द्यायला
मलाच ना जळायचे?

पहा, भिजेल पापणी
जपून ओघळायचे!

तुझ्यात काय गोडवा,
तुला कसे ...

वारूळ सोमवार, ०७ मे २०१२, १९:५२ (+०५:३०)

क्रांति अग्निसखा

जरी पायांतली मी धूळ झाले,
तरी साऱ्या व्यथांचे मूळ झाले!

शहाणी संगती होती तरीही
पुरे आयुष्य माझे खूळ झाले

गळ्याचा फास झाले शब्द केव्हा,
कधी संवेदनांचे सूळ झाले

करावी ...

अनेकदा सोमवार, ०७ मे २०१२, १९:५० (+०५:३०)

क्रांति अग्निसखा

जसे दिसे ते तसेच नसते अनेकदा
कळूनही मी बळेच फसते अनेकदा

कधी कधी काळजात खुपतात चांदण्या
मुकी कळीही फुलून डसते अनेकदा

मला हव्या त्या सुरांत नसले तरी कसे
तुझेच गाणे मनात वसते अनेकदा?

बरे ...

जुळले अजून आहे बुधवार, ०२ मे २०१२, १२:२६ (+०५:३०)

जयश्री गूढ माझ्या मनीचे

सरले बरेच काही, उरले अजून आहे
कोठेतरी जरासे, जुळले अजून आहे

वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या
वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे

संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या
स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे

वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे

स्वप्नांचे..! सोमवार, २३ एप्रिल २०१२, २३:५४ (+०५:३०)

दिलखुलास

भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे
उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे

नशेमधे असतानाही मी बरळलोच नाही
कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे

हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला
ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे

चटई निर्देशांक ...

जमाखर्च शनिवार, २१ एप्रिल २०१२, ११:१० (+०५:३०)

क्रांति अग्निसखा

हवेसे वाटणारे बंध फासासारखे झाले
दिल्याने घेतल्याने शब्द बाणासारखे झाले

तुला बोलायचे होते, मला ऐकायचे होते
कसा संवाद, जेव्हा मौन वादासारखे झाले ?

दिली माझी फुले अन् घेतले काटे तुझे थोडे
मिळो काही, जमा अन् खर्च आता सारखे झाले

कुठे मुक्काम ...

पेच शनिवार, २१ एप्रिल २०१२, ११:१० (+०५:३०)

क्रांति अग्निसखा

प्रश्न ते साधेच होते
उत्तरांना पेच होते

वेदना होती नवी अन
घावही ताजेच होते

नाव नात्याचे निराळे,
जोडणारे तेच होते