देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आम्ही

आम्ही आणि ते शुक्रवार, ०५ नोव्हेंबर २०१०, १९:२८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही त्यांना ‘विठ्ठल’ म्हणतो. आणि ते आम्हाला ‘घरफोड्या’. आम्ही ‘परप्रांतीयांना’ विरोध करतो. आणि ते ‘आम्हाला’. आम्ही ‘अबू’ची अब्रू काढतो. आणि ते ‘आमची’. ते ‘चिमण्यांनो घरी या’ अस आवाहन करतात. आम्ही त्यांच्या दर्शनाला जातो. आणि ते आम्हाला ‘बाटगे’ म्हणून गेटवरूनच हाकलतात. पण उपमुख्यमंत्री त्यांना ‘पाहुणे’. आम्ही अंबरनाथला त्यांना पाठींबा दिला तर, काहीच ‘नसे’. पण विधानपरिषदेत ...

आनंदी आनंद चालू आहे शुक्रवार, ०४ जून २०१०, १४:४६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा पश्चिम बंगालमध्ये लाल भोपळ्याचे पिक गेल्याची बातमी वाचली. आणि कॉंग्रेस गवताची सुद्धा वाट लागली. काय बोलणार, उन्हाळ्यात असच होणार! पण महाराष्ट्रात मात्र कितीही कडक उन्हाळा असला तरी कॉंग्रेसच्या गवताची वाढ जोमाने आहे. दगडांच्या देशात इतका कडक उन्हाळा, आणि त्यात पाणी नाही. जिथे आहे तिथे वीज नाही. मग कुठून भाजीपाला पिकणार? बर आता भाजीपाल्यात सुद्धा कचराच जास्त असतो.

माऊवादी सोमवार, १२ एप्रिल २०१०, ०१:३७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. ...

पांढऱ्या पेशी सोमवार, ०५ एप्रिल २०१०, २२:४९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता ...

बडी बेगम रविवार, ०७ मार्च २०१०, ०१:४४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

परवा म्हणे दरबार भरला होता. मलिका ए हिंदोस्तान बडी बेगम त्यावेळी रयतेवर चिडल्या. ‘काय लावलाय महागाई आणि कर वाढ? कधी बघावे त्यावरच रयतेच रडण आपल चालूच. काय दुसरा धंदा आहे की नाही?’ सगळे सरदार जमा झाले होते. प्रत्येकाने आपआपले अर्ज दरबारात सादर केले. आता बाकी काही नाही ना म्हणून अर्ज. मग बडी बेगमने त्यांच्या शुद्ध आणि स्पष्ट भाषेत सगळ्यांना आदेश दिला की जा आणि माझ्या रयतेला सांगा ...

कोण आहोंत आम्ही ? मंगळवार, ०२ डिसेंबर २००८, २३:४७ (+०५:३०)

आशा जोगळेकर झु ळु क

कोण आहोंत आम्ही
काय आहोंत आम्ही
प्रतिक्रियावादी आहोंत काय आम्ही

नेहेमी कुणी तरी थप्पड मारल्यावर
हात उचलायचा विचार करतो आम्ही

दुसरा जेंव्हां आक्रामक होतो
तेंव्हाच फक्त बचाव करतो आम्ही

घाबरून लहानाला, घाबरून मोठ्याला
नेहेमीच सगळ्यांना घाबरून असतो आम्ही