आजच एक डोंबारयाचा खेळ पहिला आणि सहज विचार करता करता फार पूर्वी ऐकलेली एक कथा आठवली. प्रत्येकाने नेहमी आठवावी अशी आहे. म्हणून इथे लिहावीशी वाटली.
देवाने मलाच का दुख दिलं, इतर कसे सुखी आहेत असा प्रश्न प्रत्येकालाच कधी न कधी पडतो. अशाच सततच्या प्रश्नांना कंटाळलेल्या देवाने एकदा माणसांना एक सवलत देऊ केली. त्याने सांगितले कि प्रत्येकाला आपापले दुख इतरांच्या दुखासोबत बदलून घेता ...