देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मुक्तक

भविष्याला आपली गरज आहे का? मंगळवार, २० डिसेंबर २०११, १५:३४ (+०५:३०)

निरंजन नगरकर अळवावरचे पाणी

'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या ...

बदाबदा वाहणारं बूच गुरुवार, २७ ऑक्टोबर २०११, १७:४१ (+०५:३०)

कोहम कोहम?

बऱ्याच दिवसांनी ब्लॉगकडे फिरकलो. बऱ्याच लोकांनी लिहिलेलं बरंच काही वाचून माझेही बाहू स्फुरणं पावू लागले. कॉम्प्युटर उघडला. आता असं जबरदस्त काही तरी टाइप करूया की बस्स. आय ऍम बॅक ची लै कानठळ्या बसवणारी अनाउंस्मेंट वगैरे करणारं काही बाही लिहून सुखानं झोपी जावं असा एक जबरदस्त विचार मनात येऊन गेला. पण त्यापलीकडे आणि लिहिण्यासारखं असं काहीच सुचलं नाही.

मग मी स्वतःला समजावलं की ...

तुम्ही गोळी बघितलीय गोळी? शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०५:१२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?
साधी सुधी खाऊची, लिमलेटची गोळी नाही हो!
किंवा औषधाची कडू गोळीही नाही.
बंदूकीची गोळी? बॅरल मधून सुटलेली?

ती कधी असते तांब्याची, अ‍ॅल्यूमिनीअम किंवा मिश्र धातूची.
झाडल्यावर वेगात जाते अन वेध घेते एखाद्या मस्तकाची.
किंवा आरपार शरीतात घुसते
किंवा कधीकधी शरीरातच मुरते
अन मग चालू होतात रक्ताचे पाट

बस स्टँड शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०५:१२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

परवाच खुप कधीचा गावाकडे गेलो.
तशी आठवण यायची पण सवड नव्हती होत.
म्हणून वेळात वेळ काढून गेलो.
आठवणीतल्या आठवणी आठवीत गेलो.

तो बसस्टँड, तेथील पत्र्याच्या खाली सावलीत उभे राहणारे लोक,
ते शाळा कॉलेजला जाणारे पोरं पोरी,
माहेराला, सासरला जाणार्‍या नवर्‍या मुली,
ते फलाटावरच पाया पडणं, अन नवर्‍या मुलाचं अवघडून जाणं,
जागा सांभाळण्यासाठी झालेली गर्दीची लढाई,
त्या ...

लेखन व लेखकाचे बाह्यरुप शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०४:३४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप ...

व्हॅलेण्टाइन डे आणि मी मंगळवार, १५ फेब्रुवारी २०११, ००:०६ (+०५:३०)

atma atma म्हणे...

'तो' आणि 'ती'.
'तो' म्हणजे व्हॅलेण्टाइन डे आणि 'ती' म्हणजे अस्वस्थता (त्या दिवशी उगाच वाटणारी...) तर ते असं...                             की, या खास दिवसाबद्दलच आकर्षण तसं नवीन नाहीये. ९ वी - १० वीत आल्यापासून म्हणजे 'कळायला' लागल्यापासून या दिवशी अनाहूत हुरहूर लागून रहायची. एखादी 'मस्त' मैत्रीण असावी अशी पूर्वापार चालत आलेली इच्छा! 'मस्त' ची व्याख्या कालानुरूप बदलत गेली किंवा ...

मी आणि माझी कलिग मंगळवार, ०४ जानेवारी २०११, ११:३६ (+०५:३०)

atma atma म्हणे...


परवाचीचगोष्ट,माझ्यासोबतकामकरणारीएकमुलगी (सॉरी, ऑफिसातलीकलिगम्हणायलाहवं. नाहीतर ह्यांच्यास्टेटसलाआणिडिग्निटीलाधक्कापोचतो....) जेवायलाबसतानाहातातकसलातरीपांढऱ्यारंगाचापुडा घेऊनआली.मीतिलासहजविचारलं, "कायगं, हापुडाकसला?"त्यावरतीम्हणाली, "Hey, these are tissues, paper napkins!""इतके? कँटिनमधल्यासगळ्यालोकांचेहातपुसणारआहेसकीकाय?", मी."Hmpfh..." ...

कागद शुक्रवार, ३१ डिसेंबर २०१०, ०८:४० (+०५:३०)

निरंजन नगरकर अळवावरचे पाणी

आज लवकरच ती कामाला लागली. पोराला काखोटीला मारून आणि नायलॉनचं मळकट पोतं घेऊन ती नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर आली तेव्हा सगळीकडे कागदांचा खच पडला होता. काल संध्याकाळी तिथून गेलेल्या भव्य मोर्चात उधळलेल्या हँडबिलांनी इतरवेळी सुबक नेटका वाटणारा तो रस्ता आता मातीत खेळून आलेल्या वांड पोरासारखा दिसत होता. पोराला रोजच्यासारखं नंदूच्या टपरीच्या वळचणीला ठेवून ती भराभरा कागद गोळा ...

एक पत्र एका दुरावलेल्या नात्याला.......... शुक्रवार, २१ मे २०१०, १५:४७ (+०५:३०)

Ashwinis-creations ashwinis-creations

प्रिय
ठीक आहेस नं? मी फार अस्वस्थ होते. इतकी बोच मला याआधी कशाचीच लागली नव्हती.
विशेषतः तुला काय काय आरोपांना तोंड द्यावे लागले असेल या विचारानेच मला फार ताण आला होता.
मी तुला समजू शकते. तुझा भावूक, आर्त स्वभाव समजू शकते. तुझ्या या ऋजू वागणूकीचीच तर मला मोहिनी पडते.
पण इतकी तरलता नात्यांमध्ये नाही नं येउ शकत...लेबलं लागली की त्याबरोबर मूल्य ही येतं! निगोशिएशन्स येतात, ...

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता मंगळवार, १३ एप्रिल २०१०, ०३:२० (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

मी रोगजर्जर, असूनी पंगू, मरण समोर उभे, काळ
अपेक्षीत तुला मी अजूनी रहावा थोडा वेळ
दैवगती ही अशीच राहे, जीवन मिटे हे, न जगता

का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||

तू नच अभागी, मीच कमनशीबी, अर्धीच आयुष्यरेषा
अधूरेच आयुष्य ,जगलो, उरली न काही आशा ...