देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आठवणी

भोचक गेला... बुधवार, २१ जुलै २०१०, ०६:०३ (+०५:३०)

Innocent Warrior मालकंस

अभिनय कुलकर्णी अल्पावधित पत्रकारितेत आणि internet च्या विश्वात लोकप्रिय झालेले व्यक्तिमत्व एका अपघातात सोडुन गेले.

ज्या लोकांना त्यांचा blog माहित नाही त्यांच्या ...

आठवणीतलं घरगुती पावसाळी खाद्यजीवन..... शनिवार, १७ जुलै २०१०, ०२:५० (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

मे महिना सुट्टीचा म्हणून आवडीचा म्हणायचा तर शेवटाला एकदम भाजून निघाल्यासारखं व्हायचं आणि सगळ्यात जास्त वाट पाहिली जायची ती पावसाची...तोही (तेव्हा) वेळेवर यायचा आणि मातीच्या धुंद वासानं वेडं ...

दाखला रविवार, ०४ जुलै २०१०, ०२:४८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या ...

आठवणी मंगळवार, २९ जून २०१०, ०२:३७ (+०५:३०)

THE PROPHET "बाबा" ची भिंत !

'आठवणी' ह्या शब्दाशी सहसा भल्याभल्यांच्या मनाचे कोपरे हळवे होतात आणि काहीकाहींच्या डोळ्यांचे कोपरे पाणावतात. आठवणी गोड असतात तश्या कडू असतात, चांगल्या असतात तश्या वाईट असतात, हसर्‍या असतात तश्याच मुसमुसणार्‍याही असतात, आनंदाचं निधान असतात तश्या दुःखद विधानही असतात; एकंदर रॅंडम व्हेरिएबल असतात. तुम्ही आठवणी असं इनपुट दिलं, की आऊटपुट काय असेल त्याचा नेम नाही!

अनेकदा ह्या ...

सरीवर सरी शुक्रवार, १८ जून २०१०, २१:२३ (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

पाऊस! झिमझिमणारा, वादळवारे यांच्या सोबत येणारा, शिंतोडे उडवणारा, मुसळधार कोसळणारा, कसाही आवडतो मला. पाऊस हा शब्द पण मला खूप आवडतो!

पूर्वी पुण्याला पडणारा वळवाचा पाऊस आठवतोय मला. उन्हाची तलखी होत असतानाच दूरून कुठून तरी पावसाचे आगमन होणार हे जाणवायला लागायचे. रखरखीत ऊन गायब होऊन अंधारायचे. मातीचा सुगंध यायचा. आभाळात एकमेकांना बोलावल्यासारखे ढग जमा व्हायचे. काळे निळे ढग! ...

प्राजक्त शुक्रवार, १८ जून २०१०, १८:५८ (+०५:३०)

encounters with reality शब्दवेल

अगदी एकटी अशी गोष्टच सापडणार नाही. झाड तर अजिबात एकट नसतं. ते मातीशी, हवेशी, ऋतूंशी, पक्ष्यांशी आणि सरतेशेवटी अपिराहार्यपणे माणसांशी जिवंत संबंध ठेवून असतं. काही वेळा झाड आणि माणूस दोन्ही गेले तरी आठवणींची मुळे मरत नाहीत. ती तशीच काळाच्या जमिनीखाली निश्चल पडून राहतात. कधीतरी एखाद्या जुन्या संदर्भांचा उबारा मिळाला कि पुन्हा त्यांना अंकुर फुटतो, आणि थोडाफार उगवून कोमेजून जातो. ...

निकाल शुक्रवार, १८ जून २०१०, १८:२४ (+०५:३०)

priti वळवाचा पाऊस

काल दहावीचा निकाल लागला, तसा हा महिना निकालांचाच महिना, पहिले बारावी मग CET आणि आता दहावी. सतत कुठला ना कुठला निकाल लागतोय. आपला निकाल मात्र केव्हाच लागलाय, दहावी काय नि बारावी काय ते डोंगर केव्हाच मागे पडलेय, सध्या आयुष्याची गाडी सरळसोट मार्गावरून धावतेय. रोजचा दिवस सारखाच… विशेष असं काहीच नाही. सकाळी उठून आवरून ऑफीस गाठणे, ऑफीस मधली कामं  उरकने, परत सगळं पटापट आवरून घर गाठणे ...

पवनी… बुधवार, ०९ जून २०१०, १८:११ (+०५:३०)

priti वळवाचा पाऊस

पवनी, एक छोटंसं गाव, भंडारा जिल्ह्यातलं, माझं आजोळ.. बाबांकडच…एक भावनिक नातं निर्माण झालेलं गाव. निव्वळ आजी, आजोबा असतात त्या गावात म्हणूनच नव्हे पण असं  काही तरी खास आहे त्या गावात, जे फार जवळच वाटतं.

भंडारा जिल्ह्यात असलेला हा एक तालुका, भंडाऱ्या पासून  ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच ...

पाऊस शनिवार, ०५ जून २०१०, १३:५७ (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

पाऊस! झिमझिमणारा, वादळवारे यांच्या सोबत येणारा, शिंतोडे उडवणारा, मुसळधार कोसळणारा, कसाही आवडतो मला. पाऊस हा शब्द पण मला खूप आवडतो!

पूर्वी पुण्याला पडणारा वळवाचा पाऊस आठवतोय मला. उन्हाची तलखी होत असतानाच दुरून कुठून तरी पावसाचे आगमन होणार हे जाणवायला लागायचे. रखरखीत ऊन गायब होऊन अंधारायचे. मातीचा सु‌गंध यायचा. आभाळात एकमेकांना बोलावल्यासारखे ढग जमा व्हायचे. काळे निळे ढग! ...

कर्णिक बाई. रविवार, ३० मे २०१०, १९:०२ (+०५:३०)

कोहम कोहम?

कर्णिक बाई.

पाचाच्या आसपासची उंची. लांब असावेत असे केस. केसाला चापून चोपून तेल लावलेलं आणि घातलेली वेणी. अदमासे पन्नाशीच्या आसपासचं वय. डोळ्याला लावलेला, बहुतेक काळ्या किंवा कुठल्यातरी जाड डार्क बॉर्डरचा चष्मा. चष्म्यापाठचे मोठ्ठे, टपोरे डोळे, किडकिडीत शरीरयष्टी, लांबसडक बोटं आणि बोटांवरून गिरक्या घेत फिरत जाणाऱ्या हाताच्या नसा. अशा आमच्या कर्णिक बाई.

साधारण पंचवीस ...