सकाळी
सगळं एन्चॉयरमेंट अनोळखी. कुठे तरी वर शिड्या चढताना माझ्याच मित्र-मैत्रिणींचा एकदमच गलका होतो. मी त्यांच्या गलबलाटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. ते ज्या मुलीचं नाव घेऊन ओरडत होते, ती अचानक माझ्या पुढ्यात येऊन ठाकते अन् सगळ्यांचा उत्साह अगदी शीगेला पोहोचतो. एकाएकी माझ्यासमोर येऊन थांबलेल्या अतिशय सुंदर, सालस युवतीकडे पाहून माझ्या डोळ्यांची पारणे फिरतात, ...