देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विरंगुळा

दोन बहिणी सोमवार, ०७ मे २०१२, १९:३१ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

फोन खणखणला तशी मी सावरून बसले व रिसीव्हर कानाला लावला.
''हॅलो, मी खुशी बोलतेय. तुझ्याकडे अर्जंट काम आहे जरा. घरी येतेस का? '' पलीकडून खुशीचा चिंतित स्वर ऐकून मला काळजी वाटू लागली.
''का गं? काही सीरियस आहे का? ''
''हो गं, पिंकीबद्दल आहे, म्हणूनच म्हटलं ये... असं करतेस का? रात्रीची राहायलाच येतेस का.... म्हणजे निवांत बोलता येईल. ''
''ठीक आहे. मी संध्याकाळपर्यंत पोचतेच तुझ्याकडे. ...

'हा भारत माझा' चित्रपट प्रीमि... शुक्रवार, ०४ मे २०१२, १८:५५ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा. 

''हा भारत माझा'' ...

कृतार्थ रविवार, ०१ एप्रिल २०१२, १९:५९ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

''मोतीबाबू आहेत का?'' सुरेशबाबूंनी बाहेरूनच विचारले. आश्रमातील बंगल्याच्या व्हरांड्यात पायाशी शेगडी ठेवून, वेताच्या खुर्चीत आरामात वर्तमानपत्र वाचत बसलेल्या जयंतीबेन त्यांना पाहून जरा दचकल्याच!
''या, या सुरेशबाबू.... आज आमच्या बंगल्याची पायधूळ कशी काय झाडलीत? या ना, बसा, बसा. मोतीबाबू आत जप करत आहेत. येतीलच पाच-दहा मिनिटांत. काही काम होतं का?'' जयंतीबेन हातातील ...

शुभप्रसंगीची कलंक-सूचक गाणी : गारी गीते बुधवार, ०७ मार्च २०१२, १४:०२ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

शिव्यांची गाणी??? छ्या!! कल्पनाच करवत नाही ना? पण भारताच्या लोकपरंपरेत अशी एकमेकांना प्रेमळ शिव्या दिलेली सवंग गाणी मनोरंजनाच्या हेतूने गाण्याची जुनी प्रथा आहे.
अगदी परवा परवा पर्यंत मला या प्रकाराबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याचे असे झाले, भारतीय लोकगीतांच्या विविध प्रकारांचे वाचन करत असताना एक दिवस नजर अचानक एका गीत प्रकारावर येऊन थबकली. तो प्रकार होता 'गारी ...

(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न) सोमवार, २७ फेब्रुवारी २०१२, ०५:२४ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)
सहज थोडा चवीत बदल म्हणून ही पाककृती करून पाहिली आहे. चाखून चव कशी आहे ते जरूर सांगा.

लोकलमधली गर्दी सटकतांना उडालेली झुंबड, (मला) (चक्क!) नकोनकोशी
वाटणारी खिडकीची सीट, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.

धनशक्तीचे ...

भाव(खावू)गीत:फेसबुकमुळे रविवार, २५ डिसेंबर २०११, १२:०६ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

भाव(खावू)गीत:फेसबुकमुळे

तो:
जग हे आभासी कोणा न कळे
ती:
(हो रे, ते खरे, पण)
तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ||

तो:
तुझा आयडी होता आयडी हा खरा
ती:
तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा
तो:
होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१||

तो:
आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक
ती:
त्यानंतर आपण कितीक ...

अमृततुल्य जगाच्या स्मृती शनिवार, २४ डिसेंबर २०११, १५:४४ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

हातात सामान घेऊन रेल्वे स्टेशनातून बाहेर आल्यावर पहाटेचा हवेतला शिरशिरता गारवा मला चांगलाच जाणवू लागला. अंगावरची शाल घट्ट लपेटत मी दहा पावले पण चालले नसेन तोच आजूबाजूचे रिक्षावाले ''किधर जाना है? '' करत मागे येऊ लागले होते. सरळ रिक्शात बसून घर गाठावे की गारठलेल्या शरीरात चहाचे इंधन भरून गोठलेल्या मेंदूला तरतरी आणावी या विचारांत असतानाच समोर एक अमृततुल्य चहाची टपरी ...

म्हणींच्या राज्यातील गमतीजमती रविवार, २७ नोव्हेंबर २०११, २०:०३ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत  असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

हातपंप बुधवार, ०९ नोव्हेंबर २०११, ०५:०२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

हातपंप

ह्या दुष्काळानं लई ताण दिला ग बया
मला हातपंपाचा आधार हाय ग बया ||धृ||

घरचा नळ नाय कामाचा
सार्वजनीक हाय नळ गर्दीचा
वाही रातंदिस पानकाळ्याचा
त्याला उन्हाळ्यात पानी काही येईना ग बया
मला हातपंपानं आधार दिला ग बया ||१||

खालीवर दांडा करावा बरं
थोडं कष्टांचं काम हाय सारं
पानी येतंयं ...

बंड्याची दिवाळी शनिवार, २९ ऑक्टोबर २०११, १७:१३ (+०५:३०)

iravati अरुंधती kulkarni Iravati अरुंधती

आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने ...