देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सचिन

सचिनच्या महाशतकाची प्रतिक्षा रविवार, ०८ जानेवारी २०१२, २१:२५ (+०५:३०)

dhananjaykoshti Dhananjaykoshti's Blog

सचिन तेंडुलकरच्या महाशतकाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या सामन्यात तो महाशतक ठोकणार त्या सामन्यात ठोकणार असं म्हणत जवळपास आठ ते दहा महिने झालं सचिनचं ते बहुचर्चित महाशतक काही पूर्ण होत नाहीए. प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला सचिन महाशतक झळकवणार अशा हेडलाईन्स मात्र प्रसारमाध्यमात झळकतात. त्याचे चाहतेही या महाशतकाची आतुरतेनं वाट पहात आहेत. पण काही केल्या हे शतक काही पूर्ण ...

सचिनच्या महाशतकाची प्रतिक्षा रविवार, ०८ जानेवारी २०१२, २१:२० (+०५:३०)

Dee Kay Dhananjay Koshti

सचिन तेंडुलकरच्या महाशतकाची सध्या जोरदार चर्चा सुरुय. या सामन्यात तो महाशतक ठोकणार त्या सामन्यात ठोकणार असं म्हणत जवळपास आठ ते दहा महिने झालं सचिनचं ते बहुचर्चित महाशतक काही पूर्ण होत नाहीए. प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला सचिन महाशतक झळकवणार अशा हेडलाईन्स मात्र प्रसारमाध्यमात झळकतात. त्याचे चाहतेही या महाशतकाची आतुरतेनं वाट पहात आहेत. पण काही केल्या हे शतक काही ...

ढाण्या वाघ आणि आण्णांचं उपोषण शनिवार, २७ ऑगस्ट २०११, २१:५० (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

खरा भारतीय, indian,

मुंबापुरीत मच्छर फार झालेत. म्हणून हे मच्छराचं गुणगुणनं आहे असं समजून आमच्या ढाण्या वाघानं आपला पंजा आपल्याच कानाच्या दिशेनं फिरवला. पण मच्छराचा मागमूसही हाती न लागता जेव्हा त्यांच्याच पंजाचा त्यांच्याच कानाखाली जाळ निघाला तेव्हा ते समजून चुकले कि नाही हे मच्छराचं गुणगुणनं नाही, ही सिंहाची गर्जना होती.

मग डोळ्यावरची झापड ...

इंडियंस आर ग्रेट शुक्रवार, २२ एप्रिल २०११, २२:५० (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

हिदुस्तानात सम्राट अशोका पासून गौतम बुद्धांपर्यंत अनेक महात्मे होऊन गेले.

याच मातीत स्वात्यंत्र वीर सावरकर, आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, यासारखे हुतात्मे जन्मले.

याच मातीत रंगली बाजीराव – मस्तानीची प्रेम कहाणी.

ताजमहालच्या रुपात याच मातीवर उभी राहिली प्रेमाची निशाणी.

सत्तेसाठी हपापलेल्या सत्ताधुंद राजकारण्यांनी या मातीची हि ओळख पुसून टाकायचा अगदी चंगच ...

का पूजितो त्यास आम्ही?? सोमवार, १८ एप्रिल २०११, ११:१७ (+०५:३०)

Vinay माय बोली- मनाची बोली

भारताने क्रिकेट विश्व चषक जिंकल्यावर पुन्हा एकदा एकच चर्चा पुढे आली. ह्या देशात क्रिकेट खेळ नसून धर्म आहे. आम्ही इतर खेळांना तेवढे प्राधान्य देत नाही, वगैरे, वगैरे. क्रिकेटच्या ...

क्रिकेटमधली अंधश्रद्धा शनिवार, १६ एप्रिल २०११, २०:४१ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

अंधश्रद्धा किती प्रकारच्या असतात !!!

साप दुध पितो.
नागाच्या डोक्यावर मनी असतो.
सर्प धनाचे रक्षण करतो.
सापाच्या अंगावर केस असतात.
मनोहर जोशींचा गणपती दुध पितो.
वडाच्या झाडावर भुतं रहातात.

अशा एक ना अनेक अंधश्रद्धा.

अशीच एक अंधश्रद्धा क्रिकेटमध्येही आहे. ती म्हणजे -

‘ सचिननं शतक केलं कि आपण सामना हारतो. ‘

अगदी एवढयात पार पडलेल्या विश्व चषकाच उदाहरण घ्या ना. ...

हा रडीचा डाव नाही शनिवार, ०९ एप्रिल २०११, ०७:५९ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

हो नाही करता करता भारतानं वर्ल्डकप जिंकला. नुसताच जिंकला नाही. दिमाखात जिंकला.
आपण पाकिस्तान विरुद्धची म्याच जिंकली तेव्हाच माझ्या मनात -

” जिंकणे हा धर्म अमुचा, हार आम्हा ठाव नाही
तुम्ही करा काही कितीही, हा रडीचा डाव नाही.”

या ओळी आकार घेवू लागल्या होत्या. हि सगळी कविता लिहित असताना एकीकडे अम्पायरनं बाद द्याच्या आधीच मैदानातून बाहेर जाणारा सचिन आठवत ...

मुंबई का पुणे शुक्रवार, ०८ एप्रिल २०११, ०१:३७ (+०५:३०)

मी एक हौशी लेखक

आजपासून एका नवीन वादाला सुरूवात होणार आहे. मुंबई का पुणे...

हा वाद राजकीय, भाषेचा, शहरातील दळणवळण किंवा गर्दीचा नाही. या वादाला वाचा फोडली आहे ती आयपीएल-४ ने.

वर्ल्डकपचा शानदार शेवट झाला, भारताच्या विजयाचा परमानंद अजुन अनुभवत असतांना लगेचच आयपीएल-४ ची नांदी झाली. गेल्या ३ स्पर्धेत ८ संघ होते आणि या वेळेस १० संघाच्या समावेशाने चुरस वाढली आहे. या वेळी कोची आणि ...

विष्णूचा नवा अवतार रविवार, ०३ एप्रिल २०११, १४:४५ (+०५:३०)

विजय शेंडगे रे घना

( हा फोटो पहायला विसरू नका )

पाकिस्तानी गोलंदाज रियाझनं भारतीय संघाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाचवा बळी घेतला आणि भारतीय मातीवर नाक घासलं. म्हणाला, ” बाई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.”

खरंतर त्याला ” आई, तुझ्या पदरी पडलो आणि पुण्यवान झालो.” असं म्हणायचं असावं. पण पाकिस्तानी संस्कृतीत एवढी शिकवण कुठली ?

नंतर कळलं कि तो मनोमन नमाज पढून आल्लाची करून भाकत ...

आणि बुद्ध हसला.... रविवार, ०३ एप्रिल २०११, १०:१२ (+०५:३०)

Yogesh मनमौजी

तब्बल २८ वर्ष ह्या क्षणाचा करोडो लोक वाट पाहत होते...अखेरीस तो आज पुर्णत्वाला गेला.

आपला सचिन गेली दोन दशक ज्याने विक्रमांचे डोंगर रचले.ज्याच्या झोळीत आज पर्यंत असंख्य विक्रम आहेत तरी पण एका गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे "विश्वचषक". जस एखाद्या पांढ्र्‍या शुभ्र कागदावर एक लहानसा काळा डाग असावा अन त्या डागाच अस्तित्व संपुर्ण पांढर्‍या शुभ्र कागदला झाकोळुन ...