देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सय

ब्बोला प्पुंडलिक व्वरदाऽऽऽऽ शुक्रवार, २३ जुलै २०१०, ००:१४ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज ...

माझं खोबार... भाग ८ शनिवार, १४ मार्च २००९, ००:४७ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७

*************

असं सगळं असलं तरी, सौदीतल्या कट्टरपणाबद्दल, विशेषतः अरब मुसलमानांच्या कट्टरपणाबद्दल नुसतं ऐकलंच होतं. एक ते 'देहांत शासन' प्रकरण सोडलं तर तसा धार्मिक कट्टरपणा आणि अतिरेकी वागण्याचा प्रत्यक्ष कधीच त्रास झाला नव्हता.

पण एकदा काय झालं....

*************

मित्रहो, मागच्या भागात मी मला भेटलेल्या काही ...

माझं खोबार... भाग ७ शुक्रवार, १३ फेब्रुवारी २००९, १०:३५ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६

*************

मला माझ्या वास्तव्यात खूप वेगवेगळे अनुभव आले ह्या धर्माचरणाचे, अतिरेकी तसेच समजूतदारही. कधीही 'स्टिरिओटाईप' / 'पूर्वग्रहदूषित' विचार करू नये हे मी शिकलो. पण त्याबद्दल पुढे...

*************

जसं जसं माझं क्षितिज विस्तारत गेलं तसं तसं मला विविध देशातले लोक भेटत गेले. ज्या राष्ट्रांबद्दल आजपर्यंत नुसतं ऐकलं ...

माझं खोबार... भाग ६ सोमवार, २९ डिसेंबर २००८, ००:४० (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५

*************

मंडळी, खोबारबद्दल मी लिहायला लागलो आणि पटापट पहिले ५ भाग लिहून झाले. तुम्हा सगळ्यांना ते आवडले हे येणार्‍या प्रतिसादांवरूनच कळतंय. ६व्या भागाला अंमळ उशिरच झाला. त्याबद्दल क्षमस्व. बर्‍याच जणांनी वैयक्तिकरित्या 'पुढचा भाग कधी?' अशी विचारणा केली. त्याबद्दल खरंच आभारी आहे. आता पुढचा भाग टाकतो आहे.

*************
मूळात मला ...

माझं खोबार... भाग ५ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:१२ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४

*************

मित्रहो, आत्तापर्यंत मी माझ्या खोबारपर्यंतच्या प्रवासाबद्दल (जो माझा पहिला परदेश प्रवास होता) लिहिलं. 'केल्याने देशाटन...' या उक्तिची सत्यता पटायला खरं म्हणजे हा एक प्रवासच पुरेसा होता. सौदी अरेबिया मधे वास्तव्य करताना तर खूपच अनुभव आले, माणसं भेटली. निरनिराळ्या विचारधारा जवळून बघायला मिळाल्या. लोक कसे विचार करतात, ...

माझं खोबार... भाग ४ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:१० (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३

मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्य दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...

*************

मला बाहेर यायला इतका ...

माझं खोबार... भाग ३ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:०८ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली,

*************

"सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ...

माझं खोबार... भाग २ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:०३ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १

अजून इतर काही गप्पा होऊन, मी तिथून परत निघालो. मात्र परत निघायच्या आधी मी काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यात मुख्य म्हणजे की मी कुठेही जायला तयार आहे पण माझी बायको माझ्या बरोबर असेल आणि कंपनीने ती सगळी जबाबदारी घेतली पाहिजे.

मी थोडा खुशीतच घरी आलो. घरी येऊन ही बातमी सांगितली. कुणाच्या ध्यानी मनी पण नव्हतं की असं काही होईल. घरात एकदम शांतता पसरली. त्यात परत मी ...

माझं खोबार... भाग १ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:०२ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

मंडळी, काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अगदीच अनपेक्षित वळण आले. ध्यानी मनी नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसताना मला परदेशात नोकरी करायचा योग आला. आणि तो परदेश पण साधासुधा असातसा नाही, चक्क 'सौदी अरेबिया', ज्या देशाबद्दल आपल्याला नेहमीच एक भीती वाटत असते आणि कुतूहल पण तेवढेच असते. तर माझ्या या सौदी गमन आणि वास्तव्याबद्दल माझे काही अनुभव आहेत ते इथे मांडण्याचा ...

इंदौर... सोमवार, ०३ नोव्हेंबर २००८, ०७:३३ (+०५:३०)

नमस्कार, मी बिपिन. माझे दोन पैसे

खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार ...