चार महिन्याच्या कालावधीनंतर पुण्याला परत आल्यावर काही धक्कादायक बातम्या कानावर पडल्या. मी काही या बातम्या खर्या की खोट्या याची शहानिशा करण्याच्या भानगडीत पडलो नाही. एकतर या असल्या बातम्या बहुदा खर्याच असतात व दुसरे म्हणजे या बाबतीत चौकशा सुरू करून दुसर्यांच्या भानगडीत नाक खुपसू पाहणारा असे बिरूद मला माझ्यावर अजिबात लावून घेण्याची इच्छा नाही. पण या दोन बातम्या ...