हे शीर्षक मात्र वेगळेपणासाठी दिलंय हे सुरवातीलाच कबूल करतो! :) म्हणजे लिहायचंय अमृतसरबद्दलच. शिवाय हट्टी की हॅट्टी (Hatti) याबद्दल साशंक आहे. ती शंकाही कुणी दुरूस्त केल्यास स्वागत. इथली हट्टी पंजाबीतली आहे हं मराठीतली नव्हे. मराठीतल्या हट्टीशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही. (असं मीच आपलं माझ्या मनात म्हणतो! :D) पंजाबीतली हॅट्टी किंवा हट्टी म्हणजे दुकान. पंजाबी भाषा खरंतर ...