एक जानेवारीची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात, फुला-फुलांमभून मध गोळा करत भिरभिरणाय्रा फुलपाखरांच्या सहवासात गेली तर त्यापेक्षा नवीन वर्षाची सुंदर सुरवात आणखी ती काय होणार. ड्युटीच्या तासांमुळे थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचे बारा वाजलेच होते, पण त्यामुळे सकाळी मात्र साडेपाच वाजताच जाग आली. पनवेलवरून ठाणे-ओवळा ईथे पोहोचायला जवळपास ...