गेले चार पाच दिवस मी जरा व्यस्तच आहे. अनेक बारीकसारीक कामे, बॅन्कांना भेटी वगैरे सारख्या केल्याच पाहिजेत अशा या बाबी एकदम व चार पाच दिवसातच मला संपवणे आवश्यक होते कारण मला आता माझ्या वार्षिक परदेश भेटीला जाण्यासाठी निघायचेच आहे. हिवाळ्यात पक्षी जसे स्थलांतरण करतात किंवा स्वातंत्र्यपूर्व कालात भारतातला व्हॉईसरॉय जसा दर उन्हाळ्यात शिमल्याला जायला निघत असे तसाच काहीसा ...