देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Ambarish Kavita

तुझी आठवे.... रविवार, १५ नोव्हेंबर २००९, ०७:५१ (+०५:३०)

Ambarish हे नाते शब्दांचे !!!

मला सांजगंधात हरवून नेती, तुझी आठवे
सरी झेलता आज हातात येती, तुझी आठवे
जसा स्पर्शतो, गंधतो, शोधतो हा तुला गारवा
तशी सौम्य स्पर्शातली गोड नाती, तुझी आठवे

सये ये, तुझ्या
गोडव्याने मनाला तू भिजवुन जा
प्रिये, दे मला
हात हातात आणि सुखावुन जा
तुझ्या ...

उत्तरे.....!! बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, १७:३७ (+०५:३०)

हे नाते शब्दांचे हे नाते शब्दांचे !!!

उत्तरे ...!!
उत्तरे ही उत्तरे नसतातच !
ते असतात फ़क्त नविन प्रश्न उभा करायची जागा....
खोदून खोदून शेवटी एकच
भयान प्रश्न उरतो.. सृष्टि निर्मितीचा !
तोही शोधण्याचा. ..माझा अथक प्रयत्न
उगाच देवांच्या सुख-चैनिला त्रागा..
किम्बहुना उत्तरे ही उत्तरे नसतातच !
ते असतात फ़क्त नविन प्रश्न उभा करायची जागा....

मुळात उत्तरे असतात प्रश्नच !
असे प्रश्न.. ज्यावर मेंदू विचार करणार नाही

रावण ...!!! गुरुवार, २३ ऑक्टोबर २००८, १२:४३ (+०५:३०)

हे नाते शब्दांचे हे नाते शब्दांचे !!!

नितितज्ञं, बुद्धिमान, दशग्रंथी, ब्राम्हण
पराक्रमी, शिवभक्त, महाबली रावण
इन्द्रजीत, माहायोद्धा, मायावी दशानन
ब्रम्हस्तप, ब्रम्हयोगी, ब्रम्हस्थित रावण

तप ज्याने ब्रम्हाचा, अविरत जप केला
ब्रम्हमुखे विष्णुला, जणू शापच दिधला
मृत्यु ज्यास नतमस्तक, ऐसा महादानव ..... महाभक्त रावण

सुवर्णमयी लंका, विश्वकर्मे घडविली
स्वर्गाहुनी सुंदर ती, ललना नटलेली
ऐश्वर्य इतुके! ...