काही दिवसांपूर्वी मायाने, मला बा भ. ह्यांनी देवनागरीमध्ये शब्दबद्ध केलेले मेघदूत पाठवले. कधीपासूनचे वाचायचे होते. शांता शेळके ह्यांनी अनुवादित केलेले मेघदूत मीवाचले होते, पण बा. भ ह्यानी शब्दबद्ध ...
काही दिवसांपूर्वी मायाने, मला बा भ. ह्यांनी देवनागरीमध्ये शब्दबद्ध केलेले मेघदूत पाठवले. कधीपासूनचे वाचायचे होते. शांता शेळके ह्यांनी अनुवादित केलेले मेघदूत मीवाचले होते, पण बा. भ ह्यानी शब्दबद्ध ...
आत गोठलेले आसू,
वर विटलेले हसू,
ओठी आलेले, मावळे...
"थोडे नदीकाठी बसू"
घ्यावा कशाला मागोवा,
जीव अहंतेचा गोवा,
चार पावली यायचा,
वीस कोसांचा पस्तावा...
नदी रोडावली ...
मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची,नदीच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची
मला आवडते वाट वळणाची
सरघसरणीची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची
मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या* भर रानीची
मला आवडते वाट वळणाची
मला आवडते वाट ...
अंतरिक्ष फिरलो, पण
गेली न उदासी
गेली न उदासी!
लागले न हाताला
काही अविनाशी
काही अविनाशी!
क्षितीज तुझ्या चरणांचे
दिसते रे दूर
दिसते रे दूर!
घेऊन मी चालू कसा
भरलेला ऊर
भरलेला ऊर!
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी ...
इथे रंगली पंगत
मिटक्यांची, भुरक्यांची;
साधासुधा माझा हात
बाळजीभ अमृताची;
इथे चालला अभ्यास
इथे झाली भातुकली
गोष्टी, गाणी नि मस्करी
खोली भरुन राहिली;
इथे घडले पतंग
इथे फिरला भोवरा
इथे हदगा मांडला
इथे खुडला मोगरा;
खेळा-शाळेच्या मागून
दूर दूर दिसाकाठी
सांजावता ...
असे काही तरी व्हावे
अशी दाट होती इच्छा;
असे काही तरी झाले
पुरवितें तेंच पिच्छा
पैलथडी पिके अंबा
ऐलथडी हे शहारे
कुणा भाग्यवंतासाठी
मध्ये वाकतात वारे
ओल्या वाळूंतुन वर
येई रसाळ सुवास;
आणी ...
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे
सुखोत्सवे असा जीव अनावर
पिंजर्याचे दार उघडावे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी
असावीस पास जसा ...
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया
त्या वेली नाजूक भोळ्या
वारयाला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला
देऊळ ...
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती
चंद्र कोवळा पहिलावहिला
झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती
फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते ...