देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कंटाळा

कुठेतरी काहीतरी अडलंय! सोमवार, १९ डिसेंबर २०११, १८:३० (+०५:३०)

गुहर होने तक...

आलो मी एकदाचा परत या ब्लॉगवर!  लिहायला काय? लिहायला बसलो की मी बसतो लिहित, पण हे मराठीत लिहिणं म्हणजे फारच कठीण काम, फार प्रामाणिक वगैरे होऊन बसतं ते, अन्‌ मग वांधे होतात.  त्यापेक्षा आपलं The Blog of Reflections बरं, धरलं आपलं की लिहिलं! इंग्रजीत लिहितांना आपोआप वेगावर खिळ बसत जाते अन्‌ जे काही लिहायचंय (किंवा नाही लिहायचंय) ते आपोआप सेंसॉर होत जातं.  पण मग आपण लिहितो तरी कशाला; जर सेंसॉरच करायचं ...

पांडुरंग सांगवीकर यांस, गुरुवार, ०१ डिसेंबर २०११, १४:०९ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

पांडुरंग सांगवीकर यांस,

     अर्धवट पडलेले कॉलेजचे वर्ष सोडून तुम्ही गावातच आहात का अजून? कुठेही असं, पण अशी माझ्या मानगुटीला बसण्याची काही गरज नाही. आपलं झालं थोडं आणि त्यात तुमच्या 'stream of consciousness' चं घोडं असला प्रकार होतोय...आणि तरीही जगण्याच्या सगळ्या टवक्यांकडे टक्क उघड्या डोळ्यांनी बघत त्यातली निरर्थ झिंग घ्यायची खाज जात नाही...आणि म्हणून सांगवीकर मी माझ्या ...

किल्ले असावा… मंगळवार, ०२ ऑगस्ट २०११, १३:५६ (+०५:३०)

सुहास Suhas Zele's Blog

महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची ताठ मानेने साक्ष देणारे गडकोट किल्ल्यांची सफर, श्रावणातला पहिला विकांत, मस्त धो-धो पाऊस आणि दुर्गप्रेमी ...

पुरे झाल्या सुट्ट्या आता... शुक्रवार, १४ जानेवारी २०११, १८:१५ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे नोंदवही

संध्याकाळी:

मागच्या सेमिस्टरच्या परीक्षा संपून पार महिना होत आलाय, हं तसं कॉलीज आता सुरू झालं असेल देखील. पण ग्रुपमधले सगळे मित्र-मैत्रिणी सोमवारपासून रेग्युलर जॉइन करणार आहेत म्हणे, मग मी एकटंच जाऊन कशाला नाहक घोडं मारावं म्हणून अगदी मनात असूनसुद्धा कॉलीजला जायचं टाळलं. मग काय, कंटाळा-कंटाळा, काय दिवस आहेत, शिटऽऽ! असं कधी कोणाच्या बाबतीत घडू ...

जुमला! शुक्रवार, २४ डिसेंबर २०१०, २२:२६ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे नोंदवही

रात्री:

छानपैकी झोप काढावी असं दिवसा-ढवळ्या वाटण्याचा प्रसंग आज मी पहिल्यांदाच अनुभवला; एरवी प्रत्येक क्षणाची काळजी वाहणारा मी आज एवढा कसा आळशांडलो होतो, ते कळालेच नाही. सुट्ट्या म्हणाव्यात की लाइट नसण्याची सबब, त्यातल्या त्यात सर्दी, थंडी, अस्वस्थता—काहीतरी कारण मनाशी पक्के करुन अंगावर जर्किंग् चढवून मस्तपैकी दुपारी २ ते सांयकाळी ६ अशी झक्कासऽ झोप काढली. ह्म्म, जरा ...

आत्महत्येच्या एका ऐकीव बातमीबाबत शनिवार, ०४ डिसेंबर २०१०, २१:१७ (+०५:३०)

Encounters with Reality शब्दवेल

सिगारेटच्या धुरात उदास संध्याकाळचा कंटाळा हलका होताना मित्राचा फोन वाजला.... फोनवर तो थोडावेळ बोलला आणि एकदम मला म्हणाला, माझ्या एका मित्राने आत्महत्या केली. माझ्या कंटाळ्यात एक मोठे भगदाड पडले, आणि मी कुतूहलाने पुढे ऐकू लागलो... हा श्रीमंत होतं काय.... आणि इंजिनियर ...म्हणजे आमच्या ३ महिन्याच्या स्टायपेंड एवढा ह्याचा महिन्याचा पोकेटमनी... वडील प्रसिद्ध डॉक्टर , मोठा भाऊ पण ...

एक्जाम स्टार्टिंग... शुक्रवार, ०३ डिसेंबर २०१०, २३:०८ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे नोंदवही

रात्री:

डोळे जळजळ करताहेत. कारण सुद्धा तसंच आहे, नेहमीचंच रडगाणं—पूर्ण सेमिस्टरभर अभ्यास केला नाही, तो अख्खा आज सकाळी सव्वा नऊवाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत करुन मोकळा झालो... आत्ताच दिवसभरात काढलेल्या नोट्स रीव्हाइज केल्या. उद्या पेपर आहे. पेपर निघावा, एवढं तरी लिहिता आलं तरी पुरेसं असेल, तशी ...

काळोख बुधवार, ०१ डिसेंबर २०१०, २३:४६ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे नोंदवही

रात्री:

बाहेर रातकिड्यांची सहन न होणारी अविरत किरकिर केव्हापासूनची चालू आहे. अगदी सहनशीलतेच्या पलिकडे गेलाय त्यांचा हा कमी-अधिक फ्रिक्वेन्सीचा भंकस गोंगाट... वाटतंय दूर कुठेतरी पळून जावं, अगदी चिड येते कधी-कधी अशा प्रसंगी... माझं आजवर एकदाच डोकं दुखल्याचं माझ्या आठवणीत आहे, पण हे असले विचित्र अनुभव तर हल्ली नेहमीचेच होऊन बसले आहेत. जेव्हा ह्याबद्दल विचार करण्याच्या नादात ...

कव्हर्ट् वन: दि हेइडिश् फॅक्टर बुधवार, ०१ डिसेंबर २०१०, २१:५७ (+०५:३०)

विशाल तेलंग्रे नोंदवही

रात्री:

आजचा दिवस जरा कंटाळवाणाच गेला. पीएलच्या सुट्या चालू असल्यामुळे दात न घासण्याला आज सलग एक आठवडा पूर्ण झाला असावा. ते तरी बरं की हल्ली अंघोळ करण्याचा तरी कंटाळा करीत नाही. अंघोळीच्या अगोदर अद्रक टाकून काळ्या-पाण्याचा गरमागरम चहा पिण्याची माझी नियमीत सवय, पण आज तो सुद्धा लवकर मिळाला नाही! :( परिणामी कसंतरी व्हायला लागलं (भूक लागल्यावर होतं ना तसं!) अन् माझी अंघोळ होते न् ...

अनाचरटीय असुचेतन ब्ळॅ शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१०, १२:०३ (+०५:३०)

नॅकोबा मुक्ताफळे

सध्या. पोष्टीची सुरुवात सध्या नी केली की रटाळ अन् कंटाळवाणं बरंच काय काय सध्याच्या नावाखाली खपवता येतं. (इथे वाचा)

ब्लॉग सुरू करून आता दोन वर्षे होतील. ब्लॉगवर आचरटपणा सुरू करूनही आता जवळजवळ सहा महिने लोटलेत. पण कुठेतरी पाणी मुरतंय. वैचारिक शुष्कता आली आहे. पानगळीच्या हंगामात (त.टी.१) विचारवल्लीची जीर्णपर्णे प्रतिभालतिकेशी संलग्न राहण्याचा एक कृष, असहाय प्रयत्न करून अखेर ...