ब्लॉग सोहमचा
पाढे म्ह्टल की अजुनही माझ्या अंगावर काटा उभा रहातो. लहानपणी पाढे पाठ नसले की छडीसोबत गुरुजींच एक वाक्य नेहमी ठरलेलं असायचं " अरे आमच्यावेळी आमची दिडकी , पावकी तोंडपाठ असायची आणि तुम्हाला साधा १७ चा पाढा येत नाही. आता १७ च्या पाढ्याला साधा म्हणणार्या गुरुजींच्या विद्वत्तेला आणि गुरुजींच्या काळात आम्हाला जन्माला न घातल्याबद्द्ल देवाला नमन करुन आम्ही त्या छड्या खात ...