प्रेमाविषयी मी बऱ्याच पोस्ट लिहिल्यात आहेत. त्यात जसा अनेक प्रेम कवितांचा तसाच काही लेखांचाही समावेश आहे. माणसं एकमेकांवर प्रेम करतात. त्या प्रेमाला नात्यांच्या अनेक किनारी असतात. नातं जेवढं जवळचं तेवढी प्रेमाची दृढता अधिक. तू तुझ्या भावावर प्रेम कर असं कुठल्याही बहिणीला सांगावं लागत नाही. तसंच तुला बाळ झालंय आता तुला पान्हा फुटायला हवा असं कुठल्या आईला सांगावं लागत नाही. ...