देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पुणेकर

माझे पुणे, तुमचे पुणे! गुरुवार, २२ सप्टेंबर २०११, ०८:२८ (+०५:३०)

chandrashekhar ब्लॉगर अक्षरधूळ Blogger Akshardhool

मागच्या शुक्रवारी, एका छोट्याच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या पार्टीचे मला निमंत्रण आले होते. ही पार्टी होती पुण्याच्या औंध भागातल्या एका रेस्टॉरंटमधे. मी या ठिकाणी पूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे तिथे गेल्यावर, तिथले एकूण वातावरण, झगमगाट व लोकांची गर्दी पाहून मला थोडेफार आश्चर्यच वाटले. आपण नक्की पुण्यातच आहोत का? अशी शंकाही क्षणभर मनाला चाटून ...

` नागफणी वसुल ! ` बुधवार, ०१ सप्टेंबर २०१०, ०९:२७ (+०५:३०)

अनाकलनीय अनाकलनीय

पुण्याच्या आसपास भटकंतीची अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे पुणेकर जसा वेळ मिळेल तसे हमखास जाऊन येतातच ! पण अशीही काही वसुल अनामिक ठिकाणेही आहेत जिथे किमान एकदा तरी जाऊनच यायला हवे ! खंडाळ्याच्या घाटातला 'ड्युक्स नोज' चा सरळसोट सुळका त्यापैकीच एक ! अगदी पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटातून जाताना डावीकडे कोकणात कोसळताना दिसणारा हा कातळ म्हणजे 'ड्युक्स नोज'. नाव जरा विचित्रच. ...

आपण पुणेकर कसा ओळखायचा ? सोमवार, १९ एप्रिल २०१०, १५:०८ (+०५:३०)

Harshal Features : Japanese,Software and Drama/Theat...

आपण पुणेकर कसा ओळखायचा ? 
पुढीलगोष्टींचीयशस्वीपुर्तता झालीअसेल तर आपणच खरे पुणेकरआहात.काहीनवीनगोष्टीअगरजुन्याअसतीलतर यात समाविष्ट करा.
१.  कितीहीगर्दीअसलीतरीआपणएकदातरीमंडईतल्यागाळ्यातून भाजी आणलीअसेल. 
२.ऐनरस्त्यातभरगर्दीतएकदातरीबसकिंवारिक्क्षावाल्याशी  बा -चा- बा-ची  ...

माझा राग बुधवार, १८ नोव्हेंबर २००९, ००:३२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

शनिवारी रात्री नऊ वीसच्या पुणे लोणावळा लोकलने आई वडिलांबरोबर घरी यायला निघालो. लोकलमध्ये एक बह्हादार ज्या बाजूने चढतात त्याच बाजूला बसलेला. आईला लोकलमध्ये चढताना त्याच्यामुळे अडचण झाली. ते बघून खरच माझ पित्त खवळल. खर तर आठची लोकल रद्द करण्यात आल्याने गर्दी झाली होती. त्यात ह्याने अडचण केली. त्या रागाच्या भरात त्याला मी दोन लाथा आणि गुद्दे लगावले. तो बह्हादार ...

१०० शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २००९, ००:४१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला ...

खेद गुरुवार, ०५ नोव्हेंबर २००९, १०:५२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संध्याकाळची सात वाजताची पुणे लोणावळा लोकल नेहमी प्रमाणे उशिरा आली. पण आनंदाची गोष्ट अशी कि ह्यावेळी गाडी उशिरा येणार याची सूचना दिली गेली. तीच रटाळ ‘हमे खेद है’ ची आकाशवाणी. पुण्यात लोकल उशाराची सवय सगळ्यांनाच झाली आहे. त्यामुळे कोणीही आजकाल चिडत नाही. घरी आल्यावर पंतप्रधानांनी ‘खेद’ व्यक्त केल्याची बातमी म.टा वर वाचली. चंडीगड येथील पीजीआयएमईआर या ...

चिंब पावसानं मंगळवार, ०६ ऑक्टोबर २००९, ०२:१० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल दुपारीपासूनच पावसानं पुणे झोडपायला सुरवात केली आहे. काल सकाळी सकाळी आकुर्डी स्टेशनवर जात असताना एका दुधाच्या गाडीचा झालेला अपघात बघितला. आता ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघात परवा रात्री झाला असावा. आता मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मोडलेली गाडी पाहायला मिळाली. स्टेशनवर आलो तर कोल्हापूर एक्स्प्रेस थांबलेली. लोकलमध्ये चढलो तर चिंचवडला ‘प्रगती’ आणि ‘डेक्कन’ ...

लग्न का करावे? रविवार, २७ सप्टेंबर २००९, ००:०० (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे ...

टीव्ही आणि मी बुधवार, १६ सप्टेंबर २००९, ००:१२ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

दोन वर्षांपूर्वी मी मुंबईच्या एका आयटी कंपनीत रुजू झालो होतो. त्यावेळी मुंबई नवीन असल्याने मी माझ्या गिरगावमध्ये मावशीकडे राहायला होतो. तसा गिरगावात मी एकच महिना होतो. पण याच काळात माझ टीव्ही विषयीचे मत बनायला सुरवात झाली. कंपनीची अशी काही ठराविक वेळ नव्हती. कधीही या आणि आठ तास काम करून घरी जा. माझी कंपनी डीएन रोडवर होती. मला माझ्या मावशीचे घर ते कंपनी हे अंतर ...

काळजीपेक्षा भीतीच जास्त मंगळवार, ०८ सप्टेंबर २००९, ०१:०९ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

मागील दोन दिवसांपासून मला थोडी सर्दी आणि खोकला झाला होता. मला सहसा आजार होत नाहीत. पण यावेळी मात्र सर्दी झाली आणि त्यानंतर खोकला. आईच काही विचारू नका. मी काही म्हटलं नाही तरी मेडिकल मध्ये जाऊन व्हिक्स, दोन पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आणल्या आणि घे म्हणाली. आता तिच्याशी काही वाद घालण्यात काही फायदा नव्हता. बर मी काल घेतो म्हणालो आणि सकाळी विसरलो. तर आईने ताबडतोप माझ्या ...