देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कुसुमाग्रज

पाचोळा सोमवार, १४ जानेवारी २०१३, २१:३७ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास ...

जोगीण - कुसुमाग्रज सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, ०८:५४ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून ...

अनामवीरा शुक्रवार, ११ डिसेंबर २००९, ११:१० (+०५:३०)

अमित कविता, मला भावलेल्या...

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांतस्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वातधगधगता समराच्या ज्वाला या देशासाठीजळावयास्तव संसारातून उठोनिया जाशीमूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषामरणामध्ये विलीन होसी, ना ...

वगैरे! रविवार, २२ नोव्हेंबर २००९, १३:०९ (+०५:३०)

Ganesh Dhamodkar मराठी कवितेच्या जगात..

कधी तुझ्यास्तव
मनात भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवात जे घर
बांधूनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!
तव शरिरातून
कधी पेटती
लाल किरमिजी
हजार ज्योती
त्यात मिळाया
पतंग होतो
परि नसे ते
काम वगैरे!
कधी ...

कोलंबसाचे गर्वगीत रविवार, २२ नोव्हेंबर २००९, १२:२७ (+०५:३०)

Ganesh Dhamodkar मराठी कवितेच्या जगात..

कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही, दुभंग धरणीला कराया, पाजळू दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूडसमाधान मिळाया, प्रमत्त सैतान
जमवूनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे ...

निर्माल्य बुधवार, ०४ फेब्रुवारी २००९, १८:२८ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी

मातीची दर्पोक्ति - कुसुमाग्रज बुधवार, ०४ फेब्रुवारी २००९, १८:१५ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि ...

बायरन - कुसुमाग्रज शनिवार, ३१ जानेवारी २००९, ०१:२५ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

वेगे आदळती प्रमत्त गिरिशा लाटा किनाऱ्यावरी
पाषाणी फुटती पिसूनि कणिका लक्षावधी अम्बरी
आणी झिंगुनि धावती पुनरपी झुंजावया मागुनी
भासे वादळ भव्य उग्र असले त्या गर्व-गीतातुनी !

अभ्रांच्या शकलांमधून तळपे, भासे जसा भास्कर
शब्दाआडुनही त्वदंतर दिसे उन्मत्त अन् चंचल !
केव्हा बद्ध सुपर्ण पंख उधळी तोडावया ...

जा जरा पूर्वेकडे ! - कुसुमाग्रज शनिवार, ३१ जानेवारी २००९, ००:३१ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

(चीन-जपानी युद्धांत चाललेले राक्षसी अत्याचार या कवितेत अभिप्रेत आहेत।)

जा जरा पूर्वेकडे !

वाळवण्टी कोरता का एक श्वानाचे मढे ?
जा गिधाडांनो, पुढे
जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेताचा पद
जा जरा पूर्वेकडे !

आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा
भागवा तेथे तृषा,
ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे,
जा जरा पूर्वेकडे !

गात गीते जाउ द्या हो थोर तांडा आपुला,
देव आहे ...

जालियनवाला बाग - कुसुमाग्रज गुरुवार, २९ जानेवारी २००९, २३:१४ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे ...