देवनागरी
Roman
Press F12 to toggle

शांता शेळके

५६) दिसते मजला सुखचित्र नवे -अनुराधा पौ... मंगळवार, २६ जुलै २०११, ०९:२९ (+०५:३०)

डॉ सोमेश आणि सौ. अश्विनी काकडे हृदयामधले गाणे

चित्रपट :अष्टविनायक
दिग्दर्शक :राज दत्तकलाकार :सचिन पिलगावकर, वंदना पंडित, पद्मा चव्हाण, राजा गोसावी संगीतकार :अनिल-अरुणगीतकार :शांता शेळकेवर्ष :१९७९

डाऊनलोड
दिसते मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखितेप्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेलीपरी

असेन मी, नसेन मी - शान्‍ता शेळके गुरुवार, १६ जून २०११, १०:०५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ सहित )
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
असेन मी, नसेन ...

घन रानी साजणा - शांता शेळके शुक्रवार, १० जून २०११, ०८:४६ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
घन रानी साजणा !
मी कशी तुझ्यासवे
चुकले वाट रे, सांग ना
घन रानी साजणा !

भिरभिर वाऱ्याची
थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी
मनभर गाण्याची
तरी बाई सूर नवे नवे
सुखद मधुर वाटतात हवे या ...

रेशमाच्या रेघांनी - शान्‍ता शेळके शुक्रवार, २७ मे २०११, ०९:४८ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला !

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर ...

जे वेड मजला लागले - शांता शेळके शनिवार, ३० एप्रिल २०११, १०:३२ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ?
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ?

मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी
जे मी मुकेपणि बोलतो शब्दात ते रंगेल का ?

हा ...

ही वाट दूर जाते - शांता शेळके बुधवार, १६ मार्च २०११, ०६:५८ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ...

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे - शांता श... बुधवार, १६ फेब्रुवारी २०११, १९:५२ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे

किर्र बोलते घन वनराई
सांज सभोवती दाटून येई
सुख सुमनांची सरली माया पाचोळा वाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर ...

टप टप टप टप टाकित टापा - शांता शेळके सोमवार, ०७ फेब्रुवारी २०११, १२:१९ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा ...

खोडी माझी काढाल तर - शांता शेळके शुक्रवार, ०४ फेब्रुवारी २०११, २१:१३ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ सहित )
खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट,
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट, सारी तुमची ऐट !

अंगावरती याल तर असा देइन ठोसा,
कोपऱ्यात जाउन तुम्ही रडत बसा, जावा रडत बसा !

बजरंग माझा भाऊ ...

दाटून कंठ येतो - शांता शेळके शनिवार, २२ जानेवारी २०११, २२:२५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
दाटून कंठ येतो ओठांत येइ गाणे
जा आपुल्या घरी तू जा, लाडके, सुखाने !

हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी या ...