देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मंथन

शेतकर्‍यांची समांतर विधानसभा गुरुवार, ०८ डिसेंबर २०११, २१:२८ (+०५:३०)

बळीराजा - Baliraja

प्रसिद्धीपत्रक

शेतकरी संघटनेच्या वतिने

‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’

१०, ११ डिसेंबरला नागपुरात

                       मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता रोको, ...

॥सिडनीपुराणम्॥ रविवार, १७ जुलै २०११, ०१:०२ (+०५:३०)

मंदार मी उरलासुरला थेंब!

श्री गणेशाय नमः। सचिनं वन्दे।
अथ सिडनीपुराणम।

२००३-२००४ चा ऑस्ट्रेलियन समर, बोर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार स्टीव्ह वॉचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना त्यामुळे या सामन्याकडे अख्ख्या जगाची नजर वेधलेली होती. एकीकडे मागल्या खेपेला भारतात झालेल्या मानहानीकारक पराभवाची सव्याज परतफेड करून त्यांच्या कप्तानास ...

मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी शनिवार, ३० एप्रिल २०११, १५:०८ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

२९मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी             ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार ...

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू... मंगळवार, २६ एप्रिल २०११, १४:५२ (+०५:३०)

Gangadhar Mute Gangadhar Mute's Site-गंगाधर मुटे-शेतकरी विह...

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!
आदरणीय अण्णा,
                        आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे ...

महिमा कशाचा ? सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

महिमा कशाचा ? 

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर....

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची ...

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती. सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल ...

शेतकरी कुणाला म्हणावे? सोमवार, २५ एप्रिल २०११, २२:२३ (+०५:३०)

Gangadhar Mute Vidarbha Shetkari Sabha - विदर्भ शेतकरी सभा

शेतकरी कुणाला म्हणावे?

प्रश्न :- शेतकरी कुणाला म्हणावे?

उत्तर :-  या निमित्ताने येथे आपण ज्या शेतकरी घटकाबद्दल चर्चा करतोय,ज्याला केंद्र बिंदू ठेवून चर्चा करतो आहे, त्या " शेतकरी Model " ची व्याख्या करावी लागेल.
            जो सावकारकीचा व्यवसाय करतो, इतर व्यवसाय करतो, खरेदी-विक्री संस्था सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, राजकीय पक्षांचे पुढारी, शाळा - संस्था चालक, सरकारी ...

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन सोमवार, २४ जानेवारी २०११, २०:३० (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटून जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत आणखी वाढतच जाते, वैताग येतो. आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणून आपण विषय सोडून देत ...

शरद जोशींचे भाषण मंगळवार, १६ नोव्हेंबर २०१०, १०:१६ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

शेगाव महामेळाव्यात भाषण करताना शरद जोशी.

……………………………….
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट
                                                     शरद जोशी

                या मंचावर उपस्थित असलेले आंध्रप्रदेश,हरयाना,कर्नाटक या राज्यांचे शेतकरी प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या महिला शेतकरी भावांनो आणि मायबहिनींनो, ...

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….... बुधवार, १३ ऑक्टोबर २०१०, २३:२१ (+०५:३०)

Gangadhar Mute बळीराजा - Baliraja

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!”

वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या रावेरी येथिल महिला मेळाव्यात शेतकरी संघटनेने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्हा कचेरीच्या बाजूला म. गांधी पुतळ्यासमोर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!” असा खणखणीत इशारा देण्यात आला. सभेत बोलतांना शेतकरी ...