देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लघुकथा

बडबड बुधवार, १२ सप्टेंबर २०१२, २०:४४ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

"ए हळू रे!"

"काय हळू? अशीच मजा येते!"

"म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?"

"नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?"

"ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!"

"आणि तू माझी गाय"

"पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!"

"ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना."

"नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत ...

चॉईस बाय वैम्पायर रविवार, ०७ नोव्हेंबर २०१०, १९:४१ (+०५:३०)

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ prasik

     रात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.

     काळोख्या रात्री ती एक भक्ष्य हेरून त्याच्या बेडरूम मधे प्रवेश करते. तो एक २४ वर्षाचा तरूण आहे. त्याच्या मानेतील शिरेमधुन ...

ती शनिवार, १३ फेब्रुवारी २०१०, ०२:२७ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.

तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. ...

एकेकाचं जग मंगळवार, १६ सप्टेंबर २००८, २१:०६ (+०५:३०)

अभिजित् The other side of me

तो कधीच संयमी नव्हता.त्या दिवशी मात्र प्रेयसीबरोबरच्या प्रामाणिकपणाचे किस्से पेपरात आले.आपल्यावरच संतापलेला तो मित्राकडे जाऊन केलेल्या नशेत, सगळं विसरून गेलेला.रात्री उशीरा ...

श्री तशी(?) सौ बुधवार, ३१ ऑक्टोबर २००७, १८:४६ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

आरती रागारागाने घरी परतली, तिच्यामागून संदेशही.
आरती तणतणत म्हणाली,"तुला सांगितलं होतं आज मला त्या खेळात भाग घ्यायचा आहे. दरवेळी तुझं हे आपलं असंच. काय बिघडलं असतं तुझं? बायकोसोबत कशात भाग घ्यायला नको. बाकी चार मित्र भेटले की ...

निर्णय शनिवार, ०४ ऑगस्ट २००७, ०१:५५ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

डोळे पुसत पुसत मानसी घराबाहेर पडली. घरी तिचे बाबा अगदी रागारागाने लाल होऊन तिच्या आईशी बोलत होते. "बघितलंस ना, पुढे शिकवण्याचे परिणाम. म्हणे करू दे ना तिला कॉलेज, करु दे ना नोकरी. बघा आता बाप बोलत असताना समोर थांबायची पण शिस्त ...

गोष्ट एका प्रेमाची सोमवार, २५ जून २००७, १२:३९ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

रात्रीचे ९ वाजले तरी स्वाती अजून ऑफिसमध्येच होती. एक काम केव्हापासून संपवायचे होते पण कितीही प्रयत्न केले तरी तिला प्रोग्रॅममधल्या चुका मिळत नव्हत्या. बरं ती सीनियर म्हणून ही असली किचकट कामे तिच्याकडेच यायची. नेहमीप्रमाणे ...

मत्सर सोमवार, २१ मे २००७, ०६:५१ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

संध्याकाळी ७ वाजता आशिष कसाबसा घरी पोहोचला. आजचा दिवस तसा फारच गडबडीचा होता. सकाळपासून घरी फोन करायलाही वेळ मिळाला नव्हता, आरती किती रागात असेल हे सांगायची गरजच नव्हती. पण आशय ला तरी कुठे पाहिलं होतं त्याने सकाळपासून. घरातून ...

अल्टर+कंट्रॊल-डीलीट शुक्रवार, ११ मे २००७, १२:४३ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

मे महिन्याचे काही दिवस सुट्टी घेऊन नितीन घरी आलेला. मस्त उशीरा उठायचे, आईच्या हातचे जेवण,दुपारची झोप, संध्याकाळचा चहा, जुन्या मित्रांशी कट्ट्यावरच्या गप्पा आणि रात्रीच्या जेवणानंतरचे पान........ :-) मला तर कल्पनेनेच स्वर्गात ...

इन्स्पेक्शन शनिवार, ०५ मे २००७, २२:०७ (+०५:३०)

Vidya Bhutkar माझिया मना जरा सांग ना

मधली सुट्टी व्हायची वेळ जवळ येत होती आणि तिच्या पोटातले कावळे अजूनच ओरडायला लागले होते. मराठीची कसलीतरी कविता जोशीबाईंनी शिकवली होती. शेजारच्या 'ब' तुकडीतून भोसले बाईंचा आवाज इकडेही ऎकू येत होता. त्या भोसले बाईंपेक्षा आपल्या ...