देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मंगेश पाडगांवकर

९१) सरीत सोनचाफा -सुरेश वाडकर, कविता कृ... शनिवार, ०३ मार्च २०१२, १४:२० (+०५:३०)

डॉ सोमेश आणि सौ. अश्विनी काकडे हृदयामधले गाणे

ध्वनिमुद्रिका :हा चंद्र जागलेला
संगीतकार :शंक-नील
गीतकार :मंगेश पाडगांवकर
वर्ष :१९९३

डाऊनलोड
सरीत सोनचाफा, भुलून भिजण्याचेदिवस माझे तुझे...प्राणांत अचानक, सुगंध भरण्याचेदिवस तुझे माझे...
बोलता बोलता श्वास, घालू लागले उखाणेचालता चालता वाट, पावलात झाली ...

आतां उजाडेल ! बुधवार, २९ फेब्रुवारी २०१२, २१:४१ (+०५:३०)

Suresh - सुरेश शिरोडकर ~~ बालभारती - मराठी कविता ~~

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा ...

जेव्हा तिची नि माझी - मंगेश पाडगावकर बुधवार, २९ जून २०११, ०९:२५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले
पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले
कैफात काजव्यांची अन्‌ पालखी ...

भेट तुझी माझी स्मरते - मंगेश पाडगांवकर मंगळवार, १४ जून २०११, १८:३९ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या ...

भावनांचा तू भुकेला रे मुरारी - मंगेश पा... गुरुवार, ०२ जून २०११, ०९:०३ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

भाबडी ...

या जन्मावर, या जगण्यावर - मंगेश पाडगावकर रविवार, १५ मे २०११, ०६:१६ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर, या ...

डोळ्यांत सांजवेळी - मंगेश पाडगावकर गुरुवार, १२ मे २०११, ०८:२७ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ सहित )
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ...

असा बेभान हा वारा - मंगेश पाडगांवकर बुधवार, १३ एप्रिल २०११, ०८:२९ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, ...

धरिला वृथा छंद - मंगेश पाडगावकर मंगळवार, १२ एप्रिल २०११, ०८:०७ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
धरिला वृथा छंद
नव्हतेच जर फूल, कोठून मकरंद?

जरि जीव हो श्रांत
नाही तृषा शांत
जलशून्य आभास शोधित मृग अंध

झाले तुझे भास
मी रोधिले ...

शब्दांच्या पलिकडले - मंगेश पाडगावकर मंगळवार, १५ मार्च २०११, ०८:५६ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ...