नव्या प्रारंभासाठी- सोन्यासारख्या दिवसाच्या - सोन्याहुन पिवळ्या ...
नव्या प्रारंभासाठी- सोन्यासारख्या दिवसाच्या - सोन्याहुन पिवळ्या ...
सर्वांना नुतन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा हे नववर्ष आपणास सुखसमृद्धीचं आणि इच्छापुर्ती करणारं जावो हिच देवाचरणी प्रार्थना !
बापरे ! चार महिने होत आले काहीच लिहिले नाही. खरंच वाटत नाही. ब्लॉग शांत... सुस्त झालाय. हे सगळे महिने फार धावपळीत गेलेत. आपण ठरवतो खूपकाही पण ते सगळेच घडते असे नाही. अनेकदा गोष्टी आपल्या हातात नसतातच. आपल्याला मात्र वाटते की आपण कमी पडलो... पण मागे वळून त्रयस्थपणे पाहत अदमास घेतला की कळतं, हे काहीसं असंच होणार होतं. मग पुन्हा नवीन रुखरुख लागते.... हे आधीच का नाही समजलं - पटलं आपल्याला ? उगाच ...
एखादी गोष्ट संपणार म्हणून आपण सुरुवात करायला थांबतो का?
नाही ना...
प्रत्येक येणाऱ्या वर्षाचेच असेच असते. प्रत्येक येणाऱ्या वर्षाचे स्वागत आपण मोठ्या उत्साहात करतो. नवे नवे संकल्प बनतात आणि हे संकल्प पुर्ण करण्याचे (अ)यशस्वी प्रयत्न करतो. :)
आज ३१ डिसेंबर ला दुपारी सहज फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि २०११ च्या काही आठवणी ताज्या झाल्या...
१ जानेवारी २०११ हा दिवस तर ...
नमस्कार,
सर्व वाचकांना, मित्र-मैत्रिणींना व हितचिंतकांना "विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"
आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर "मी एक हौशी लेखक" हा ब्लॉग स्व:त च्या संकेतस्थळावर विराजमान झाला ...
अखेर ज्या क्षणाची वाट प्रत्येक भारतीय पाहात होता ती रात्र आली. भारताने २८ वर्षानंतर पुन्हा विश्वविजेतेपद मिळवले...
१९९६ च्या स्पर्धेतले विनोद कांबळीचे अश्रू...image: dailybhaskar
२००३ मधले उपविजेतेपद...Image: www.currentnewsindia.com
ओळीतून लक्ष दिवे
स्वप्नांना रंग नवे
दैत्य सरो, दु:ख हरो
याहुन मग् काय हवे
सुख, शांती, समृध्दी
अन् इच्छित सर्व मिळो
दीपांच्या तेजाने
तिमिर जळो, नभ उजळो
दिवाळी म्हटलं की सजावट, रांगोळी, फराळ, फटाके यांसोबत आनंदाची पर्वणी म्हणजे दिवाळी अंक. सन १९०९ मधे 'मासिक मनोरंजन' या पहिल्या दिवाळी अंकापासुन सुरू झालेली हि वाचनाची परंपरा यंदा १०१ वर्ष पुर्ण ...