1962 मधे झालेल्या चींन बरोबरच्या लढाईत, भारताचा जो दारूण आणि सपशेल पराभव झाला त्याची पार्श्वभूमी व पूर्व लडाखमधला घटनाक्रम, आपण मागेबघितला आहे. परंतु हे युद्ध प्रत्यक्षात दोन आघाड्यांच्यावर लढले गेले होते. लडाखबरोबरच भारताच्या ईशान्य कोपर्यातल्या अरुणाचल प्रदेश या राज्याच्या सीमेवर या युद्धाची दुसरी व अतिशय महत्वाची आघाडी होती. लडाखमधल्या सीमेबाबत भारत व चीन ...