देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इतर

निबंध स्पर्धा २०१० रविवार, १८ जुलै २०१०, १०:४७ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

मधुसूदन सत्पाळकर स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध-स्पर्धेचे आयोजन

मैत्रेय उद्योग परिवाराचे संस्थापक कै. मधुसूदन सत्पाळकर ह्यांच्या १२ ऑक्टोबर ह्या स्मृतिदिनी गेल्या वर्षापासून राज्यव्यापी ...

रांगोळी बुधवार, ०७ जुलै २०१०, १५:५२ (+०५:३०)

priti वळवाचा पाऊस

रांगोळी म्हणजेच रंगांच्या ओळी. घरासमोर काढली जाणारी रांगोळी मांगल्याचे प्रतीक मानली जाते. किती तरी विविध प्रकारे रांगोळी काढता येते जसे फुले, पाने, थेंबांची रांगोळी, संस्कारभारतीची  रांगोळी.  भारतात वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीला वेगवेगळी नावे आहेत. जालावरून काही नावे मिळवली ती अशी:

पश्चिम बंगाल : अल्पना
बिहार : रिपाणा
उत्तर प्रदेश : चोव्कपुराना
राजस्थान : मदाणा

एखादा दिवस… बुधवार, ३० जून २०१०, १८:१३ (+०५:३०)

priti वळवाचा पाऊस

एखादा दिवस असतो असाच.. कंटाळवाणा… आळसावलेला……काही कारण नसतं तरीही उगाचच कंटाळा येतो सगळ्या गोष्टींचा, उदासवाणा वाटतो. काय बरं कारण असावं ह्याच्या मागे. नीट झोप झालेली नसणे, भूक लागलेली असणे, एखादी छोटीशी गोष्ट मनासारखी न होणे ज्यामुळे actually  कोणालाच काहीही फरक पडणार नसतो, कोणाला कशाला स्वतःला पण काहीच नाही. पण तरीही आपल्यालाच उदास वाटतं.

आणि मग एकदा का असा उदासवाणा दिवस चालू ...

Left Hand Driving Vs. Right Hand Dr... शुक्रवार, २५ जून २०१०, ००:२४ (+०५:३०)

कृष्णाकाठ

नुकताच भारत दौरा करून आलो. प्रत्येक भारत दौ-यामध्ये, अगदी पहिल्या दिवसापासून कार चालवायचा माझा प्रयत्न असतो.

ईथे यु.एस. मध्ये रस्त्याच्या उजवीकडून गाडी चालवायची सवय लागलेली असते. त्यामूळे भारतात रस्त्याच्या डावीकडून गाडी चालवायला पहिल्या दिवशी थोडे अवघड जाते. या right-hand traffic(steering on left hand side of car) ते  left-hand traffic(steering on right hand side of car)च्या बदलामूळे आणि automatic gears ते manual gears च्या बदलामूळे माझ्या हमखास होणा-या ...

घन घन माला नभी दाटल्या... शनिवार, १९ जून २०१०, १४:५१ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

ह्या घामोळ्याने तर पार भंडावून सोडलंय.... नुसती चावत असतात सारखी...कधी एकदा पाऊस येतोय असं झालंय...ह्यावर्षी पहिल्या पावसात नक्कीच भिजायचं...सर्दी होवो नाही तर ताप येवो...पण ही घामोळी जाऊ देत ...

पाऊस…. मंगळवार, ०१ जून २०१०, १९:०७ (+०५:३०)

priti वळवाचा पाऊस

ऑफीस मधे काम करत असताना बाहेरच्या दुनियेचा काही पत्ताच नसतो, आपला पीसी आणि आपण असं दोघांचंच जग असतं पण आज मात्र अचानक घु..घु.. असा आवाज यायला लागला आणि सगळेच लोकं आपापल्या जागेवरून उठून  बघू लागले.. अरे झालं  काय, कसला आवाज येतोय आणि अचानक लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं…. बघतच रहावसं वाटलं…

दिसत होती ती फक्त उडणारी धूळ, झाडांची पाने, एखादा जीव गेलेला पेपर….. थोड्याच वेळात पावसाला ...

नंदनचे ब्रिटनच्या निवडणूकीवरील प्रे... बुधवार, ०५ मे २०१०, १९:५५ (+०५:३०)

कृष्णाकाठ

माझा मित्र शिवनंदन पिंगळे याने ब्रिटन मधील होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत माहिती देणारे एक ...

गमवा, कमवा... मंगळवार, ०४ मे २०१०, १४:५३ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

वृत्तपत्रातील ती ठळक बातमी वाचून तमाम वाचकवर्ग... कुणी अचंबित झाला, कुणी नि:शब्द झाला, कुणी ’भारा’वून गेला तर कुणाचा भार ’हलका झाला. ...

पाटी मंगळवार, २० एप्रिल २०१०, २३:१६ (+०५:३०)

कृष्णाकाठ

आज ऑफिसमध्ये एक नोटिस वाचली…आणि थेट पुणेरी पाटीची आठवण आली.

त्याचे काय आहे…आमचे ऑफिस सध्या दुस-या जागी शिफ्ट होत आहे. त्यामुळे ...

जाहिरातींचं युग????? मंगळवार, २० एप्रिल २०१०, २१:५९ (+०५:३०)

अपर्णा माझिया मना

जाहिरातींच युग हा निबंध उलटून युगं गेल्यासारखी वाटतात..का म्हणजे च्यामारिकेत (साभार: मीनल) आल्यापासुन जाहिराती म्हणजे वॉर्निंग बेलच वाटतात...म्हणजे या देशातली तमाम जनता कुठच्या नं कुठच्या आजारानं ...