नेहमीसारखेच काम संपवून घरची वाट धरायला त्याला पावणे सहा वाजले. आता कितीही धावपळ केली तरी ६:०२ चीच लोकल मिळणार होती. तो जेव्हा सीएसटीमच्या फलाटावर नेहमीच्या टोकाला आला तेव्हा नेहमीप्रमाणेच ५:५८ ची मात्रूभूमी स्पेशल फलाटाला लागली होती. पुरूष प्रवासी नेहमीसारखेच त्या लोकलच्या नावाने बोटे मोडत होते. कशाला पाहिजे महिला स्पेशल ? हार्बरवर तर तिची काहीच गरज नाही ! यातले निदान एरवी ...