देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आजोबा

नाही शुक्रवार, १६ जुलै २०१०, १४:२३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना!

रात्री आईसोबत या विषयावर बोललो. ...

रद्दताई पाटील मंगळवार, २९ जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कोणीही चिडायचे नाही आता! आठ जणांची फाशी रद्द केली म्हणून. करणारंच ना! एकतर त्यांना चीन, अमेरिका सारख्या ठिकाणी तुम्ही लोक फिरवता. काय खोट बोलू नका.. २६ मे ते ३० मे ला आजींना चीनला पाठवलं. एक तर इच्छा नसतांना इतक्या सह्या करायला लावल्या. त्या आधी २९ ऑक्टोबर ते १ नोहेंबर २००९ मध्ये साइप्रस, त्याआधी २६ ते २९ ऑक्टोबर २००९ ला इंग्लंडमध्ये. किती सह्या करायच्या त्यांनी? आणि हजार पानी ...

जात रविवार, ३० मे २०१०, ०१:३१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

ते म्हणतात ना, जी जात नाही ती ‘जात’. खर आहे. काल पहाटे, (म्हणजे सुट्टीच्या दिवशी माझी पहाट दुपारी बाराच्या पुढे होते) जनगणनेसाठी एक बाई आल्या. माहिती घेत असतांना माझी ‘जात’ विचारली. ‘जात’ सांगितल्यावर बाईंचा चेहरा आणि वागण्यात सुद्धा बदल जाणवला. थोडं बेकार वाटलं मला. अजूनही ‘जातीपाती’ लोक पाळतात. शिक्षक लोक असे ‘जातीवंत’ झाले तर भविष्य अवघडचं आहे. जातीजातींमध्ये अजूनही तेढ आहेत. ...

विंडोजच्या आईचा घो बुधवार, २४ मार्च २०१०, ०१:१८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आई कोणाला नाही माहित? बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने ...

पाल मंगळवार, १६ मार्च २०१०, ००:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

एक महिना झाला. म्हणून कार्यक्रम सुरु झाला. सगळ्या मुंग्या आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या पालीही तिथे हजर होत्या. सगळ्यांनी मिळून वारुळाच्या संरक्षणाची शपथ वगैरे झाल्या. एका मागे एकाची भाषणे झाली. मग मुख्य आणि सिंहासारखी पाल भाषणाला पुढे आली. आणि आपली सत्य वाणी सुरु केली. मी इथ आल्यापासून पहाते आहे. सगळ्या मुंग्या आपल्या आपल्या कामात दंग. कोणाच आपल्या वारुळाकडे ...

चर्चेखेरीज अन्य पर्याय नाही सोमवार, ०१ मार्च २०१०, ०३:४२ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

आजोबांनी कालच आम्ही भांडू शकत नाहीत. आणि गप्पा मारणे याखेरीच काही पर्याय नाही अस स्पष्ट केल. आता सौदी अरेबियात आहेत. काही नाही थोडी हवा पालट. अस कस तीन दिवस सुट्टी नाही का? आजोबा २७ तारखेपासून एक मार्च पर्यंत आहेत तिथे. तिथल वातावरण चांगल आहे म्हणे. पण यावेळी आजोबा खूप वेळ भारतात होते. याआधी हवामानाच काही तरी चर्चा होती म्हणे त्या कोपनहेगनमध्ये. आता आपल्या इथलं उष्ण तापमानामुळे ...

सुट्ट्यांचा देश रविवार, २८ फेब्रुवारी २०१०, १०:५३ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस ...

सवयीची गुलामी गुरुवार, ११ फेब्रुवारी २०१०, ०८:२८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

मला गप्पा मारण्याची सवय आहे. दिवसातून एकदा तरी मी कोणाशी ना कोणाशी गप्पा मारल्या शिवाय राहावतच नाही. तसाच संगणकावर बसून काम कारण ही देखील सवय आहे. मागील वर्षी मी माझ्या कोकणातल्या काकाकडे तीन दिवस गेलो होतो. सगळ छान होत. पण तीन दिवस संगणक शिवाय कसे काढले देव जाणे. संगणक किती मोठा आणि जीवनातला घटक बनला आहे हे त्यावेळी मला कळले. आता सवय आणि व्यसन यातला फरक सांगण्याचे तत्वज्ञान मी ...

कत्तलीची रात्र मंगळवार, १३ ऑक्टोबर २००९, ००:०९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कदाचित तुम्ही हा शब्द एकाला असेल किंवा नसेलही. पण मी लहानपणापासून आमच्या गावात ही रात्र बघितली आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला ‘कत्तलीची रात्र’ म्हणतात. मग ती निवडणूक साधी ग्रामपंचायतीची देखील असली तरी. मी शाळेत असताना नेहमी आमच्या गावाच्या सुरवातीला असणारी झोपडपट्टीत आधी निवडणुकी आदल्या दिवशी होणारी कत्तलीची रात्र माहिती होती. तिथे निवडणुकीच्या ...

चंपी जयंती शुक्रवार, ०२ ऑक्टोबर २००९, ०२:०३ (+०५:३०)

hemant athalye हेमंत आठल्ये

काल रात्री जेवताना माझ्या लहान भावाला मी उद्या सुट्टी आहे का म्हणून विचारलं तर तो नाही म्हणाला. मग त्याने मागील वर्षीचा घडलेला किस्सा सांगितला. तो म्हणाला मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरला सकाळी रिक्षावाले काका एका मुलाला न्यायला गेले तर त्याचे वडील त्याला म्हणाले ‘आज चंपी जयंतीची तुम्हाला सुट्टी नाही का?’ असं लहान बंधूराजांनी सांगितल्यावर घरातील सगळेच हसू लागले. ...