देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रश्नोत्तरे

जर्मन शिका मराठीतून:भाग ५]जर्मन भाषेची ... गुरुवार, १० नोव्हेंबर २०११, १८:२९ (+०५:३०)

Tablet PC

जर्मन भाषेमध्ये प्रश्न हे इंग्रजी भाषेतील “Wh-Question” सारखे वापरतात.यास जर्मन भाषेत W-Fragen (वे –फ्रागेन) असे म्हणतात. वाक्याच्या सुरवातीस हे शब्द वापरून प्रश्न विचारला जातो.

आपण पुढील देलेल्या तक्त्या मध्ये जर्मन प्रश्न विचारण्यास कोणते शब्द वापरतात याची माहिती घेवूया.

इंग्रजीतील Wh शब्द

जर्मन प्रश्नार्थक शब्द

जर्मन उच्चार

मराठी ...

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) सोमवार, ०५ सप्टेंबर २०११, ०३:५२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc
बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय ...

सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची... शुक्रवार, ०२ सप्टेंबर २०११, ०१:२१ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत ...

स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला... बुधवार, १९ जानेवारी २०११, १२:११ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा.

पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. ...

शिक्षणसंस्थांची पैसे कमविण्याची पद्धत शनिवार, ३१ जुलै २०१०, १८:३६ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

मागच्या आठवड्यातील स्थानिक दैनिक. त्यातील जाहिरात. एका खाजगी डी.एड. कॉलेजला शिक्षक पाहिजे म्हणून.
जाहिरातीत त्याच्यांकडलाच छापील अर्ज करावा अशी सुचना. त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नाही.

माझा जवळचा मित्र एम.ए. बी.एड. झालेला. त्याने आज मला-शनिवारी सुटी-असल्याने मुलाखतीस बरोबर येण्याची विनंती केलेली. सकाळी १० वाजता नाशिकरोडला निघालो. कॉलेजच्या स्थळी ...

ऑफिसातले गाणे रविवार, २० जून २०१०, ११:०२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

ऑफिसातले गाणे

जय महाराष्ट्र मंडळी!
आपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता ...

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला... बुधवार, १७ मार्च २०१०, ०४:१२ (+०५:३०)

Pashanbhed - पाषाणभेद पाषाणभेद - PashanBhed

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

डिस्क्लेमर : या काथ्याकूटात मिपावर असणार्‍या फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते.

साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत ...

अशीही उत्तरे-भाग-३ गुरुवार, ११ मार्च २०१०, ००:५९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

अशीही उत्तरे-भाग-३
गंगाधर मुटे 
.… थोडक्यात उत्तरे लिहा …. 
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – चक्कु सुर्‍या खुपसणकर.
प्रश्न – पत्ता द्या ?
उत्तर – कोणता देवु. टोपाझ की इरास्मिक ?.
प्रश्न – अहो गावाचे नाव सांगा ?
उत्तर – भामटीपुरा.
प्रश्न – आवडता चित्रपट?
उत्तर- पॉकेटमार,हाथ की सफाई.
प्रश्न – आवडीचे स्थळ ?
उत्तर – बस स्टॅंड,रेल्वे स्टेशन,गर्दीचे ठिकान.
प्रश्न ...

…अशीही उत्तरे-भाग-२ शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०१०, १६:१९ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

… अशीही उत्तरे-भाग-२

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला ...

…अशीही उत्तरे-भाग-1 सोमवार, २२ फेब्रुवारी २०१०, ०७:२६ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

…. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर ...