स्थळ : सदाशिव पेठ, पुणे. ……. साठेकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ? तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख ...
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे. ……. साठेकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ? तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख ...
झालं एकदाचं. आज मी तिच्याशी तीच्या त्या नव्या डेस्कवर जाऊन बोललो. सकाळी कंपनीत आल्यावर तीचा मेल पहिला. किती छान. आणि त्यात ‘टू’ मध्ये सुरवातीला मी. अगदी मस्त वाटायला लागले. मग हिम्मत करून तीच्या डेस्ककडे निघालो. पण कालप्रमाणे, तीच्या डेस्कजवळ जातांना पुनः हिम्मत गेली. मग तिथून त्या एपीएमच्या डेस्कवर गेलो. मुळात काहीच कारण नव्हते. पण तरीही विषय काढला. तिथून निघालो त्यावेळी काहीच ...
आज सकाळी तिच्याशी बोललो. हुश्श! श्वास सोबतच देत नाही आहे. किती वाट पाहायला लावली तिने. चार दिवस! जातच नव्हते. काय सांगू? आज तिची ओढणीचा आणि माझ्या शर्टचा रंग एकच आहे. खूप छान वाटले. बोलतांना अस वाटत होते की, जवळपास चार वर्षांनी भेट झाली. आज ज्यावेळी ती सकाळी आली त्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नव्हती. कॅन्टीनमध्ये जाऊन आल्यावर तिच्या डेस्कपासून जातांना ती ...
संपली एकदाची उत्कंठा! तिला बघायला काल गेलो होतो. लुक सोडला तर बाकी सगळ छान आहे. असो, आई-वडिलांना ते स्थळ योग्य वाटत आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत मी फारच गोंधळून गेलो होतो. ‘प्रत्येकात काही ना काही कमी असते. कुठे ना कुठे काही तरी तडजोड करावीच लागेल’ अस वडील म्हणत होते. पण खर सांगू का, तिला पाहून काहीच वाटत नव्हते. काही तरी इच्छा निर्माण व्हायला हवी ना!
रात्री आईसोबत या विषयावर बोललो. ...
आज या ब्लॉगच्या उद्घाटन जागतिक ‘स्टार’ ऑक्टोपस बाबांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली हितगुज.
मी- जय ऑक्टोपस बाबा!
बाबा- (सर्व पाय वर करून..) विनोद जय माझी नाही करायची रे! सगळी त्या परमेश्वराची कृपा आहे.
मी- तुम्ही सध्याला जगातील एक क्रमांकाचे अचूक भविष्य सांगणारे ‘ज्योतिषी’ आहात. गेल्या काही दिवसात तुम्ही जे भविष्य सांगितले ते ...
मागील आठवड्यात वडिलांचा फोन आला होता. पुन्हा एक ‘स्थळ’. झालं! मी काही म्हणायच्या आत वडिलांनी छत्तीस गुण जुळत आहेत. आणि मुलगी देखील दिसायला बरी आहे. मग येत्या रविवारी पहाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आता वडिलांना ‘नाही’ कसं बोलणार. ठीक आहे म्हणून मी फोन ठेवला. तरीच म्हणतोय, गेल्या आठवड्यापासून माझ्या डाव्या डोळ्याची पापणी का सारखी फडफडते आहे. परवा गेलो घरी. काल सकाळी श्रीरामपूरला ...
सकाळी नाष्ट्याला जातांना एका मित्राने आज संकष्टी आहे अस सांगितलं. झालं! मी आज उपास करणार अशी घोषणा मित्रांमध्ये करून टाकली. आजकाल मी कुठलाच काही विचार न करता निर्णय घेतो अस आजच्या निर्णयावरून कळायला अख्खा दिवस गेला. घोषणा केल्या केल्या मित्रांनी जणू काही फार मोठा विनोद सांगितल्यावर हसावं तस हसायला सुरवात केली. एका मित्राने तर, तुझा पापाचा घडा भरून वाहतोय. उपास केल्याने काही ...
परवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ ...
पाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला ...
“मनात राहिलं मन एक” ला पहिले १०० सब्स्क्राईबर्स मिळायला १ वर्ष २ महिने लागेल! आणि त्यानंतरचे १०० मिळायाला किती वेळ लागला असेल!? फक्त ३ महिने! म्हणजेच मनात राहिलं मन एक चे आता २०० हून अधिक सब्स्क्राईबर्स झाले आहेत. मनोविश्व टुलबारचे २२९ डाऊनलोड्स झाले आहेत. सर्व सर्व रसिक वाचकांचा मी अगदी मनापासून आभारी आहे! आपलं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या! या लिंकवर माझी ऑर्कुट कम्युनिटी आहे. ...