देवनागरी
Roman
Press F12 to toggle

audio

केली पण प्रीती - मंगेश पाडगांवकर शुक्रवार, १६ एप्रिल २०१०, ०४:०५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती
लाख चुका असतील ...

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो - सु... मंगळवार, १३ एप्रिल २०१०, ०४:४८ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो !

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो !
दुभंगून ...

वय निघून गेले - सुरेश भट रविवार, ११ एप्रिल २०१०, ०५:३१ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहि... शुक्रवार, ०९ एप्रिल २०१०, ०३:५५ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ह्रदयात विझला चंद्रमा... नयनी न उरल्या तारका...
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे ...

पैलतिर - सुरेश भट रविवार, २८ मार्च २०१०, ०५:४२ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा

इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा !

ऐकली न येथे आपुलकीची ...

अशी पाखरे येती - मंगेश पाडगांवकर सोमवार, २२ मार्च २०१०, ०२:४० (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
अशी पाखरे येती ;आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत; दोन दिसांची नाती- ध्रु

चंद्र कोवळा, पहिला वहिला; झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी; काळोखाच्या राती -१

फुलून येता फुल बोलले; मी मरणावर हृदय तोलले

तुटले - संदीप खरे गुरुवार, १८ मार्च २०१०, ०५:०७ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - सहित )
या आधी कुठल्याच कवितेबद्दल मी कधी काही लिहिलं नाही. उद्देश हाच कि त्या कवितेचं / गाण्याचं रसग्रहण कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय व्हावं. पण या कविते साठी मात्र अपवाद म्हणून थोडं लिहिणार आहे.
माझी संदीप नि लिहिलेली अत्यंत आवडती कविता. आणि त्याला सलील नि संगीत सुद्धा तितकाच समर्थ पणे दिलंय. गाणं जरा कुठे शास्त्रीय अंगानी जायला लागलं असं वाटायला लागतं तितक्यात एक छोटा ...

भय ईथले संपत नाही - ग्रेस शुक्रवार, १२ मार्च २०१०, ०६:३४ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
भय ईथले संपत नाही,मज तुझी आठवण येते,मी संध्याकाळी गातो ,तु मला शिकविली गीते
हे झरे चंद्र सजणाचे ,ही धरती भगवी माया,झाडाशी निजलो आपण,झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शुनी गेला,सितेच्या ...

एका तळ्यात होती..- ग. दि. माडगुळकर मंगळवार, ०९ मार्च २०१०, २३:३७ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक.

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक.

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना ...

या चिमण्यानो परत फिरा - गं.दि. माडग... शनिवार, ०६ मार्च २०१०, १८:३८ (+०५:३०)

शंतनू देव माणिक मोती

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नको रे आईपासून दूर
चुकचुक करते पाल उगीचच चिंता मज लागल्या
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या

इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई
अजून आहे उजेड इकडे, ...