देवनागरी
Roman
Press F12 to toggle

fiction

एका सफाई मुकादमाचे मनोगत शनिवार, २० नोव्हेंबर २०१०, १०:२७ (+०५:३०)

श्रीराज goods carrier

पालिकेच्या बिल्डिंगपासून स्टेशन फार काही लांब नव्हतं. कालच माझ्या ठेकेदाराने मला हा एर्या दिला. खरंतर गेले कित्येक दिवस मी गार्डन आणि त्या जवळचा एर्या साफ करत होतो; पण प्रकाश गावी गेला आणि त्याचं काम माझ्यावर येऊन ठेपलं. तसाही गार्डनकडला भाग रोज साफ करायची गरज नसायची. म्हणून काल जेव्हा त्याने मला ह्याबद्दल विचारलं तेव्हा माझ्याकडे आढेवेढे घेण्यासाठी कारण नव्हतं. कचर्याची ...

ती शनिवार, ३० ऑक्टोबर २०१०, १९:४९ (+०५:३०)

श्रीराज goods carrier

वडिलांना पुन्हा नोकरी लागली होती म्हणून तो खूप खुष होता, कारण आता त्याला पुन्हा बासरीच्या शिकवणीला जाता येणार होतं. हातात प्लास्टिकची पिशवी, त्यातून डोकावणारी क्रीम रंगाच्या कापडी पिशवीतली काळी-४ आणि चेहर्यावरील पोरसवदा कुतूहल. लहानपणी आईने पाडून दिलेला भांग त्याने अजूनही इथे तिथे नेला नव्हता. लांबट हनुवटी, रुंद जिवणी, सरळ टोकदार नाक. देखणा होता तो. आज क्लासला जायचं म्हणून ...

निर्धार सोमवार, २५ ऑक्टोबर २०१०, ०८:४३ (+०५:३०)

श्रीराज goods carrier

५ वाजून ३० मिनिटं होताच विशालचा मोबाइल खणखणू लागला. कानापासून मेंदूपर्यंत तो आवाज पोहोचताच डोळ्यांवर झापडांची हालचाल झाली. जबरदस्तीने डोळे उघडून त्याने स्नूझचे बटन दाबले. १० मिनिटं झाली आणि ते डबडं पुन्हा वाजू लागलं. यावेळी डोळे चोळत तो उठलाच. गजर बंद करून त्याने शेजारी टेबलवर ठेवलेले 'चिकन सूप फॉर वुमन्स् सोल' हातात घेतले आणि त्यात ठेवलेला त्याच्या बायकोचा फोटो बाहेर काढला. ...

अंधेरी शुक्रवार, २२ ऑक्टोबर २०१०, १०:२२ (+०५:३०)

श्रीराज goods carrier

अंधेरीला पोहचता पोहचता
एकदा डोळ्यावर अंधेरी आली
साड्या दागिन्यांची रोषणाई
त्यांना झेपवलीच नाही

आजूबाजूला बाघितले
अन् हळूच मित्राला ...

बिबट्यापासून सुटका: अशी आणि तशी बुधवार, १६ जून २०१०, १९:५३ (+०५:३०)

Tushar B Kute A Strange World

पुण्याच्या दैनिक केसरी मध्ये सन २००२ मध्ये लिहिलेली एक घटना इथे देत आहे. ...

चल माऊ दूर जाऊ! शुक्रवार, ०१ जानेवारी २०१०, १८:४२ (+०५:३०)

काचा-कवड्या

“मांजरा, आज काय काय गोष्टी घडल्यात! आपल्याला कामासाठी काही दिवस दूरच्या मोठ्ठ्या गावाला जावं लागणार आहे. आणि गंमत म्हणजे त्याच काळात काही अतिशय प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन तिथे भरणार आहे! वा वा काय छान योगायोग आहे पहा!”

काळ्या-हिरव्या मांजराला काहीच घेणं नव्हतं. बेबलॉश्की नुकताच कामावरून परत आला होता आणि तो आता कधी बशीत दूध ओततोय याचीच फिकीर ...

शोध, हरवलेल्याचा आणि त्या पलीकडचा रविवार, १३ डिसेंबर २००९, २१:५८ (+०५:३०)

काचा-कवड्या

सर्व दिशांना तलम शांतता पसरली होती, नेहमी असते तशीच. शांतता आणि अंधार, तोही नेहमीचाच. कधीमधी एखादा तुटता तारा या दोन्हीला भेदून कुठच्यातरी अदृश्य आकर्षणाच्या मागे धावायचा तेवढाच काय तो बदल. अवकाशाचं हे कोंदण बारनूला फार आवडायचं कारण अवकाशात तरी त्याच्या मागे लागलेले प्रश्नांचे भुंगे त्याची पाठ सोडायचे, काही काळापुरते का होईना.  
पण आज का कोणास ठाऊक ...

निळ्या पाण्यात निळी शाई शनिवार, १९ सप्टेंबर २००९, २१:५७ (+०५:३०)

काचा-कवड्या

आजचा दिवस काही बेबलॉश्कीसाठी बरा दिसत नव्हता. त्यानी सकाळी कॉफीत साखरेऐवजी मीठ घातलं, मग नीनाच्या ऐवजी भलत्याच कुणालातरी फोन लावला. हे सगळं कमी की काय म्हणून त्याने धुतलेलेच कपडे परत धुवून काढले! आपण खूप वेंधळ्यासारखं वागतोय हे त्याच्या लक्षात आलंच दुपारपर्यंत. मग त्याला फार ओशाळवाणं वाटायला लागलं.

तसं बघायला गेलं तर असे प्रसंग बेबलॉश्कीच्या आयुष्यात वरचेवर ...

लव्ह ऍट फर्स्ट साइट! बुधवार, १६ सप्टेंबर २००९, १९:२९ (+०५:३०)

Sudoku Fantastic Five

ती दोघं म्हणजे मेड फॉर इच अदर! त्याला ती आणि तिला तो! बास याशिवाय दुसरं काही घडूच शकणार नव्हतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी त्यांनी एकमेकांना पाहिलं होतं. अगदी त्या क्षणाला त्या दोघांनाही या “मेड फॉर इच अदर’ची जाणीव झाली होती. पहिले काही दिवस चोरटे कटाक्ष, लपूनछपून पाहणे, असे नेहमीचे प्रकार झाल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीमुळे ते एकमेकांशी बोलू लागले. म्हणजे तिची ती मैत्रिण, सविता, ...

नीनाची भरजरी भेट शनिवार, १२ सप्टेंबर २००९, २२:२२ (+०५:३०)

काचा-कवड्या

त्या दिवशी संध्याकाळी बेबलॉश्की नीनाला भेटायला तिच्या घरी गेला होता. ती गेले काही दिवस गावाला गेलेली असल्यामुळे बेबलॉश्कीला तिला भेटता आलेलं नव्हतं. आता तिच्या घराच्याबाहेर जेव्हा तो पोचला तेव्हा त्याला तिच्या घराची खिडकी उघडी दिसली. त्यानी आत डोकावलं तर त्याला नीना आत पुस्तक वाचत बसलेली दिसली. त्याला वाटलं तिची केस थोडे वाढलेत आणि तिचा रंगही त्याला थोडा सावळा ...