…आणि त्याच्यासमोर असणारी आव्हानं
अरूण म्हात्रेंच्या एका कवितेच्या ओळी अशा काही आहेत –
हे कुठले रस्ते आपण घडवित जातो
वळणावर कुठली वळणे दडवित जातो
क्षितिज जसें दिसतें
तशी म्हणावी गाणीं…
ग्रेसांचं लिखाण मला नेहमी गूढ वाटत आलं आहे, पण अनाकलनीय कधीच नाही. कविता ‘कळली’ नाही तरी जाणीवेच्या पातळीवर त्यांच्या कविता आपला परिणाम ...
काल असाच बागेश्री वाजवायला घेतला. किती सुरेल राग आहे, पण बासरीवर मला प्रॅक्टिस नाहीये. म्हणून काल थोडे स्वच्छंद आलाप वाजवल्यावर बागेश्रीचा आरोह-अवरोह लयीत वाजवायला घेतला.
ध़ ऩी॒ सा ग॒ म ध नी॒ सा॑, सा॑ नी॒ ध म ग॒ रे सा
खरंच, मी ...
आज Daylight Saving Time सुरू झाला, त्यामुळे सात वाजेपर्यंत सूर्य होता... त्या मावळत्या सूर्याला बघत आज यमन वाजवला. गंमत आहे... कालपर्यंत जर एक तास लवकर वाजवलं असतं तर असाच सूर्यास्त दिसला असता, पण तरीही आज सूर्य जास्त वेळ आहे असे वाटून छान, वेगळे ...
ईप्रसारण म्हणून एक छान मराठी इंटरनेट रेडिओ आहे. त्यावर काल कुमार गंधर्वांवर कार्यक्रम होता. काम करता करता रेडिओ ऐकू म्हणून मी सुरू केला आणि "प्रभू अजि गमला मनी तोषला" ऐकल्यावर काम करणे अशक्य झाले. बाजूला ठेवले काम आणि अर्धा तास ...
मंद्र सप्तकातील मध्यमापासून मी जरा दूरच राहतो, कारण ते खालचे भोक ढोपराने बंद करणे अजून तितकेसे जमत नाही. तीव्र मध्यम निदान बासरी आतमध्ये वळवून वाजतो, पण त्यातही एवढी सहजता आलेली नाही अजून. यमन वाजवताना त्यामुळे जरा बंधन येते, पण ...
आज पुन्हा यमनमध्ये आलाप वाजवले. संध्याकाळचीच वेळ. छान येत होते सूर. नंतर काही ताना वाजवल्या.
नी रे ग रे ग रे, ग म ग म ग रे, ग म ध नी, साही सुरावट तिय्या घेताना छान वाटते. किंवा थोडा बदल:
नी रे ग रे ग रे, ग म ग रे, ग म ध नी सा नी, साहे ...