तिन्ही सांजेची वेळ होती. मी असाच तलावाकाठी बसलो होतो. मंद वारा वहात होता. पाण्यावरच्या हलक्या लाटा हळूच पायावर येवून धडकत होत्या. सूर्यास्त झाला होता. संधिप्रकाश चहूकडे दाटला होता आणि मनात एक प्रकारची हुरहूर दाटली होती. अचानक मारव्याचे सूर कानावर पडले आणि मी त्या सुरांमध्ये विरघळून गेलो.. त्यावेळी मारवा एकदम माझ्या मनाला भावला! आणि जसा जसा ऐकत गेलो तशी माझी ...