दळण तेच दळत रहातं
जातं फक्त बदलत रहातं
कधी जाणूनबुजून
कधी सहज आपोआप
कधी दुःखाच्या आवेगात
कधी सुखाच्या सृजनात
दळणात
जात्यात टाकल्याटाकल्या लगेच
चिरडून कुणीच निघत नाही
पण जातंच ते… न चिरडून निघता येईल का?
…
“प्यार व्यार सब अपनी जगह ठिक है
दुख होता है जब लोग बदल जाते है”
…
दळणही तेच
हव्याहव्याशा असणार्या नातेसंबंधांचं
जातं बदलत रहातं