देवनागरी
Roman
Press F12 to toggle

प्रासंगिक

’सत्यमेव जयते’च्या निमित्ताने! सोमवार, ०७ मे २०१२, ०९:१८ (+०५:३०)

अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव अत्त्यानंद

अमिरखानचा कालचा कार्यक्रम पाहिला....त्यात माझ्या दृष्टीने दोन गोष्टी धक्कादायक वाटल्या.  त्यातली एक म्हणजे... कुटुंबनियोजनाच्या नावाखाली सरकारनेच स्त्री-भ्रूण हत्येला चालना दिली होती....अर्थात ...

दुष्काळ - पाण्याचा व अकलेचा ! मंगळवार, ०१ मे २०१२, १३:३७ (+०५:३०)

असा हा एक(ची)नाथ ! टॅलीनामा !

पावसाळा काही आता नेमेचि येत नाही तसेच निरोपही वेळेवर घेत नाही पण दुष्काळ मात्र महाराष्ट्राच्या जणू पाचवीलाच पूजलेला आहे. मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या बातम्या व फोटो पेपरात यायला लागतात. भेगा पडलेली जमीन, तळ गाठलेल्या विहीरी, कोरडे पडलेले तलाव, पाण्यासाठी कळशी घेवून मैलोन-मैल अंतर तुडविणार्या बायका ! गेली साठ वर्षे अगदी हेच चित्र आहे ! ज्या देशात बारमाही वाहणार्या ...

एका प्रवासाची गोष्ट - २ मंगळवार, २४ एप्रिल २०१२, ०९:५२ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

वेळ वाचवण्याचा खुळा छंद कुणाला असेल का? आणि असलाच तर वेळ वाचवण्याच्या धडपडीपायी माणूस काय काय करतो? याची उत्तरे वेगवेगळी येतील. पण सुखासुखी होऊ शकणारा प्रवास टाळून आपणहून धाकधूक ओढवून घेणारा प्रवास ...

या व्यवस्थितपणाचं काय करायचं? गुरुवार, १२ एप्रिल २०१२, २०:१६ (+०५:३०)

ABHILEKH

या व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा प्रश्न कधी नव्हत ते उभा राहिला समोर. प्रश्न उभे रहातात समोर ते आपण ते उभे करतो म्हणून. संवेदना कुठेतरी काम करत असतात. त्या नसल्या तर... त्या कुणाला नसतात असं होतं का? परिस्थिती, प्राथमिकता यावर अमुक एका विषयासंदर्भातल्या संवेदना अवलंबून असतात. संवेदनापर्यंत ठीक असतं पण त्यापुढचं अतिसंवेदनशीलपण, मग हळवेपण कितपत योग्य? संवेदनांच्या या ...

काय हरकत आहे? सोमवार, ०९ एप्रिल २०१२, १६:४१ (+०५:३०)

Gouri झाले मोकळे आकाश

काही दिवसांपूर्वी ‘सामाजिक कामाचं कॉर्पोरेटायझेशन’ या विषयावर या लेखाच्या अनुषंगाने जाणकारांचे विचार वाचायला मिळाले. होते. नुकतंच जॉन वुडचं ‘Leaving Microsoft to change the World' वाचलं. मला या विषयावर काय वाटतं, ते या पुस्तकामुळे थोडं स्पष्ट झालं, म्हणून ही पोस्ट.

*******************************
१९९९ मधली गोष्ट. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारा जॉन वुड एका तीन आठवड्यांच्या सुट्टीसाठी नेपाळला गेला. ...

रमाबाई बुधवार, २१ मार्च २०१२, ००:१३ (+०५:३०)

Gouri झाले मोकळे आकाश

"उंच माझा झोका" बघायची अजून संधी नाही मिळाली मला. पण रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय!

रमाबाई पहिल्यांदा मला भेटल्या त्या आजीने सांगितलेल्या आठवणींमधून. गावंच्या गावं ओस पाडणार्‍या प्लेगच्या साथीमध्ये आजीचे वडील तिच्या जन्मापूर्वीच दगावले, तिच्या अजाणत्या वयात आईही पुन्हा प्लेगलाच बळी पडली. मामाने भाचरांना ...

गजलोत्सव २०१२ (काही प्रकाशचित्रे) मंगळवार, ०६ मार्च २०१२, १५:४० (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्‍यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले ...

फेसबुक टाईमलाईन साठी जरा हटके कव्हर बुधवार, २२ फेब्रुवारी २०१२, ०९:३७ (+०५:३०)

रमण कारंजकर आगळं! वेगळं !!!

तुमच्या फेसबुक वरील टाईमलाईन साठीचे तुमचे कव्हर जरा हटके असावे असे तुम्हाला वाटत असेल तर, या साईटचा उपयोग करुन पहा. या साईटवरील गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करुन तुमचे फेसबुक अकाउंट अॅक्सेस करायला परवानगी दिल्यावर, ही साईट तुमच्या प्रोफाईलमधील फोटो व तुमचे नांव यांचे वेगवेगळ्या प्रकारे मिक्सिंग केलेले अनेक नमुन्यांचे कव्हरचे प्रिव्ह्यू तुम्हाला ...

The Cairo Trilogy मंगळवार, २१ फेब्रुवारी २०१२, १०:१६ (+०५:३०)

Gouri झाले मोकळे आकाश

एक वर्ष पूर्ण झालं जस्मिन रिव्होल्युशनला. अजून तिचं यश अपयश ठरायचंय.

असेच आशा घेऊन आलेले दिवस इजिप्तने मागच्या शतकातही बघितले होते. लोकशाहीची स्वप्न तेंव्हाच्या तरुणांनीही बघितली होती. ‘कैरो ट्रायलॉजी’ वाचलं तेंव्हापासून या पुस्तकाविषयी लिहायचं मनात होतं. आता वाचून खूप दिवस झालेत, फारसे तपशील आठवत नाहीयेत, पण एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देणार्‍या या ...

मौनीबाबा झालाय माझा! रविवार, ०५ फेब्रुवारी २०१२, १९:०७ (+०५:३०)

मी अत्त्यानंद अत्त्यानंद

ज्याला जी गोष्ट करायला जास्तीत जास्त आवडते तीच करायला परिस्थितीवशात एखाद्यावर काही काळासाठी बंदी आली तर?तुम्ही म्हणाल,कसले भलते सलते प्रश्न हल्ली तुमच्या डोक्यात येतात हो....साठी बुद्धी ...