देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी गझल

घाव सोमवार, २१ नोव्हेंबर २०११, १७:४५ (+०५:३०)

Sagar Kokne Majhya Manatalya Kavita- माझ्या मनातल्या कवि...

जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले
मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळले
झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या
नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले

मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे
सांगे निखारा कालचा ...

अस्तित्व दान केले सोमवार, १४ नोव्हेंबर २०११, १०:०३ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

अस्तित्व दान केले

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते ...

क्षण एक पुरे जगण्यास खरा : पुण्यनगरी दी... शुक्रवार, ११ नोव्हेंबर २०११, १५:४८ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

क्षण एक पुरे जगण्यास खरा

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा

लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा

दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा

रुळताच मनी भलतेसलते

हात घसरतो आहे शनिवार, २९ ऑक्टोबर २०११, २२:०४ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

हात घसरतो आहे

अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे
रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे

कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे

बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?
जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे

खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात ...

ते शिंकले तरीही…..! गुरुवार, २७ ऑक्टोबर २०११, ०८:४१ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

ते शिंकले तरीही…..!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात ...

नव्या पिढीतील प्रतिभेचा शोध रविवार, ०९ ऑक्टोबर २०११, २३:०८ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

नव्या पिढीतील प्रतिभेचा शोध
गझल सागर प्रतिष्ठानचा उपक्रम

गझल … भावनांच्या अभिव्यक्तीचे एक सशक्त माध्यम … अरबी – फार्सी – उर्दू प्रवास करीत आलेली गझल प्रादेशिक भाषांमध्येही रुजली … बहरली … मराठी मातीत फुललेल्या या आशयघन काव्यप्रकाराचे कविवर्य माधव ज्युलियन ते कवी सुरेश भट व इतर … असे अनेक टप्पे आहेत. या टप्प्यानंतरची गझल नेमकी आहे कशी याचा शोध गझल सागर ...

बत्तीस तारखेला बुधवार, २८ सप्टेंबर २०११, ०९:२३ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

बत्तीस तारखेला

भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे ...

मी मराठी – स्पर्धा विजेती कविता शनिवार, १० सप्टेंबर २०११, २३:२६ (+०५:३०)

शेती आणि कविता - गंगाधर मुटे

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी ...

माझी ललाटरेषा शनिवार, १३ ऑगस्ट २०११, १७:२६ (+०५:३०)

Gangadhar Mute शेती आणि कविता - गंगाधर मुटे

माझी ललाटरेषा

धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली

तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली

ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का “जी हुजूर” झाली?

घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे

रात्रीस काय झाले? गुरुवार, २१ जुलै २०११, १७:४२ (+०५:३०)

विशाल माझी सखी

*************************************************

त्या धुंद पावसाळी रात्रीस काय झाले?
धुंदावल्या दिशाही, रात्रीस काय झाले?

प्रौढी कळ्यांस होती त्यांच्या कुवारतेची
झाली फुले कळ्यांची, रात्रीस काय झाले?

बहरून काजव्यांनी तेजाळली धराही
लाजून चंद्र गेला, रात्रीस काय झाले?

मी पाहिली धरेची शोभा भल्या पहाटे
रात्रीत काय चाले? रात्रीस काय ...