देवनागरी
Roman
Press F12 to toggle

इतिहास

इंडिया आफ्टर गांधी : एका अनपेक्षित देश... सोमवार, ३० जानेवारी २०१२, १४:०३ (+०५:३०)

Random Thoughts

शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून द्यायला देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही ...

तर पानिपत झालेच नसते..... मंगळवार, २४ जानेवारी २०१२, १३:३८ (+०५:३०)

Sanjay Sonawani संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

तर पानिपत झालेच नसते.....

सर्वसंहारक पानिपत युद्धाला १४ जानेवारी २०१२ रोजी २५१ वर्ष झाली आहेत. तरीही या शोकांतिकेचा सल मराठी मन-मानसावरुन अद्यापही गेलेला नाही. ज्या वीरांनी या अकल्पनीय अशा युद्धात रक्त-प्राण सांडले त्यांना आदरांजली वहात मुळात हे युद्ध झालेच का? या प्रश्नाचा उहापोह येथे करायचा आहे.
अब्दाली पाचव्यांदा चालुन आला. खरे तर मराठ्यांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा ...

येणार्‍या २६ जानेवारी निमित्तने एक स्मर... मंगळवार, १७ जानेवारी २०१२, १५:५३ (+०५:३०)

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

मित्रांनो,
हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे..

बरोबर याच दिवशी १९७१ साली……

समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात होती. अनेक वस्तू पाण्यात भरकटत होत्या, बुडून वर येत होत्या. धूराचा दर्प जाणवत होता आणि अशातच त्या बुडणार्‍या जहाजाच्या सगळ्यात ...

पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ शुक्रवार, १३ जानेवारी २०१२, ०९:५६ (+०५:३०)

Sanjay Sonawani संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

(खालील लेख हा ताज्या साप्ताहिक लोकप्रभामद्धे प्रसिद्ध झाला आहे.)

पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ
संजय सोनवणी

१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्ष होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबदल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील.

१४ ...

इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरू नका... गुरुवार, १२ जानेवारी २०१२, २२:२१ (+०५:३०)

प्रकाश बा. पिंपळे मुख्यमंत्री कार्यकर्ता

आज घरी राजमाता जिजाऊ जयंती निमित्य त्यांच्या प्रतिमेला वंदन केले.
या घरगुती कार्यक्रमा मध्ये सोसायटी मधील ३-४ लहान मुला - मुलींनी मला एक प्रश्न विचारला.. दादा हा फोटो कुणाचा ????
या प्रश्नाने मी दोन क्षण स्तब्ध झालो, खर तर हा प्रश्न येणाऱ्या पिढीने आपल्या वर्तमान पिढीला विचारलेला होता.
आपल्याला वाटते आपल्या मुला - मुलींवर शिवाजी - संभाजी किंवा जिजाऊ - झाशी च्या राणी सारखे ...

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा बुधवार, ११ जानेवारी २०१२, १३:०९ (+०५:३०)

siddharam Bhairappa patil majhe lekh

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा ...

खलिल जिब्रानने काय दिले? शनिवार, ०७ जानेवारी २०१२, २२:३९ (+०५:३०)

लेख संग्रह ...

डॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा

खलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा ...

पुणे बदलले… शुक्रवार, ०६ जानेवारी २०१२, ११:१८ (+०५:३०)

लेख संग्रह ...

श्री. ज. जोशी, सौजन्य – मटा

(पूर्वप्रसिध्दी ९ एप्रिल १९७२)

पुण्याचं सोज्ज्वळ-सात्त्विक रुपडं अनुभवलेले प्रसिद्ध लेखक श्री. ज. जोशी यांनी या बदलत्या शहराचा चाळीस वर्षांपूर्वी घेतलेला खास ‘पुणेरी’ वेध…
…….

डेक्कन जिमखान्यावर ‘पूना कॉफी हाऊस’च्या जवळ एक पेट्रोल पंप आहे. रस्त्याच्या कडेला तिथे एक छोटीशी भिंत आहे. एखाद्या दिवशी मी उगाच त्या भिंतीवर टेकतो. वेळ ...

१०६. धागा शुक्रवार, ३० डिसेंबर २०११, २१:१२ (+०५:३०)

aativas अब्द शब्द

“आमच्या कमिटीचा एक फोटो काढता का?”एका वृद्ध सरदारजींनी मला विचारलं.मी फोटो काढला.
मी गावातल्या माणसांचे फोटो काढते तेव्हा त्यांना ते लगेच दाखवते – तसाच हाहीदाखवला. ते सगळे खूष झाले एकदम.आजोबांनी तर मला ‘देव तुझ भलं करो’ अशा थाटाचा आशीर्वादही दिला. “हा फोटो मी तुम्हाला कसा ...

शिवराय समजून घेताना.. बुधवार, २८ डिसेंबर २०११, १३:४० (+०५:३०)

लेख संग्रह ...

प्रशांत दीक्षित, सौजन्य – लोकसत्ता

 

‘शिवाजी : हिज लाइफ अ‍ॅन्ड टाइम्स’ हा इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळेलिखित ग्रंथ परममित्र प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. हजार पानांच्या या ग्रंथात तत्कालीन अनेक नकाशे आणि दुर्मीळ चित्रेही समाविष्ट आहेत. ‘खुतूत ए शिवाजी’ या पर्शियन पत्रसंग्रहातील काही पत्रांच्या छायाप्रतीही त्यामध्ये आहेत. या ग्रंथाच्या ...