आज आहे शिक्षक दिन, बाकी आपले सगळ्यात पहिले गुरु तर आपले आई बाप भाऊ बहिण आणि इतर कुटुंबिय असतात यात तर वादच नाही नंतर येतात ते आपले शाळेतले शिक्षक, आज अनेकांनी (at least माझ्या फ़ेसबुक मधल्या मित्रांनी) Teacher's day म्हणुन टीचर्स नावाच्या स्कॉचची बाटलीचा फोटो शेअर करुन आपल्या गरिब मेंटॅलिटीचा परिचय करुन दिला, त्यांना अस वाटत होते की आपण फार cool काम केलेय.
असो, माझ्या ...
“अरे वैभ्या…लवकर ये माझ्याकडे… आज कार्यक्रम आहे…माझे जुने मित्र पण आले आहेत…”
“ओली कि सुकी बे?”
“सुक्या पार्टी ला तुला बोलवणार का बेवड्या…!!!”
‘”वाह वाह… आलोच…!!”
…………………..
……………..
“ये वैभ्या… वैभ्या हा हा, … तो तो, .. तो तो (तोच रे तिच्यामागे असायचा म्हणालो होतो…तोच ), … अन तो तो!…. आणि हा… हा माझा सर्वात जवळचा मित्र आहे… आणि वैभ्या आहे… माझ्या कॉलेज मध्ये आहे… ...
मराठी प्राथमिक शाळा
असं आयुष्य जिथे फक्त माहित असतं
त्याला फक्त घर आणि शाळा
ज्या घरी त्याला नसतं कसलं टेन्शन
आई-वडील म्हणजे आपला ईश्वर ..आपला सारं काही पाहणारे..!!
आणि ज्या शाळेत असतात त्याचे फक्त दोनच शत्रू..
एक म्हणजे अभ्यास आणि दुसरे म्हणजे त्याचे गुरुजी ..
झालेच तर त्याची भावंड आणि गल्लीतले पोरं …भांडण करण्यासाठी…कसल्याही शुल्लक ...
सापडली एकदाची माझी बाळबोध कविता, हो ना १२ वर्षांपूर्वी १२ वीचा अभ्यास करता करता लिहिली होती. मी पार विसरून पण गेलो होतो. पण बाबांनी इतक्या वर्षांनी थेट बायकोच्या हातात दिली वाचायला कि हे बघ याचे जुने प्रताप.
मग विचार केला कि कायम संग्रही राहण्यासाठी ब्लॉगवरच टाकावी. एकून २ कविता आहेत पण आत्ता एकच इथे टाकत आहे. मी तरी याला कविता म्हणतो. तुम्ही काही पण म्हणू शकता अगदी पद्य, ...
मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली ...
ती सतरा वर्षे. कदाचित जीवनातील सर्वात अविस्मरणीय वर्षे... वडिलांचे रागावून पाहणे... मग कुठल्यातरी गोष्टीसाठी आईकडून त्यांच्याकडे शिफारस करणे, लहानसहान गोष्टींवर रागावून न जेवणं... शाळेतली आवडलेली पहिली मुलगी, ते गुपित माहित असणारे शाळेतले मित्र... रोज अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे आणि ते मोडणं... अगदी मित्रांना शपथ घेऊन वचन देणे, मग ती दिलेली वचने विसरुन जाणे... परीक्षेच्या आधी रात्रभर ...
अलिकडे बऱ्याच ब्लॉग्जवर वाचतोय मी, सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशन बेकायदेशीर नसल्याचं सांगितलंय म्हणे. आधी वाचलं तर काही कळेचना लोक काय बोलतायत. पुण्यात असतो तर लगेच कळलं असतं. इथे सातासमुद्रापार असल्या गोष्टी चवीचवीनं चघळणारी चौकडी नाही त्यामुळे कळण्यास फारसा मार्ग नाही. ठिकठिकाणी चर्चा चालल्ये ती या नवीन निर्णयाची आणि समलिंगी संबंधांना परवानगी देणाऱ्या कायद्याची. ...
कॉलेज जीवनातील खरी मजा ही घरी न सांगताच केलेली आठवते. या सुखद घटना अगदी काल घडल्या सारख्या वाटत आहेत.
१२वी नंतर BCS ला प्रवेश घेतला. काही दिवसातच हा भला मोठा ग्रुप जमला. त्यात एकून टाळकी २०, यात निम्म्या मुली होत्या. सगळेच मध्यमवर्गातील. त्यामुळे सर्वांकडे खर्चायला पैसे हे पण मर्यादितच असायचे. व त्या मर्यादेत सुद्धा इतकी मजा केली की आता वाटतं की जास्त पैसे असते तरी अशी मजा नसती ...
माननीय सदस्य ‘प्राणी’ गण,
या नव्या दशकात दोन्ही गुहेतील पहिल्या सत्राला आपण सगळे उपस्थित आहात. मी तुमचे स्वागत करते (म्याऊ..). मला हा विश्वास आहे की तुम्ही सर्व जण या जंगलाला समृद्धीच्या दिशेने आणि विश्वात एका उच्च जागी नेण्यासाठी समर्पित होऊन काम कराल आणि गौरवपूर्ण दशक बनवाल. पुढे अजून शिकारी करायच्या आहेत म्हणून तुमच लक्ष अपेक्षित आहे.
मी त्या मुंग्यांच्या ...