देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ती

पावसाचे थेंब रविवार, २५ जुलै २०१०, १४:५७ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

गेल्या दोन तीन दिवसांपासून इतके मस्त वातावरण आहे ना! पावसाचे थेंब असले छान पडत आहेत. आत्ता तर, सूर्य नाही पण सीएफएल चा प्रकाश पडावा तसा प्रकाश पडला आहे. एकदम मस्त! मी आत्ताच भिजून आलो आहे. लोक एवढी पावसाला का घाबरतात कुणास ठाऊक? पाऊस पडत असतांना आकाशात बघायचं, ते कोटी कोटी थेंब पडतांना असले जबरदस्त दिसतात ना! आणि रात्रीच्या वेळी तर विचारूच नका. रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात पहा ...

ती कशी असेल? सोमवार, १९ जुलै २०१०, १२:१६ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच ...

परीस्पर्श बुधवार, ३० जून २०१०, ०१:१९ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर ...

ती सोमवार, २८ जून २०१०, १२:२० (+०५:३०)

शब्दांकित शब्दांकित

ती -संपदा म्हाळगी-आडकर ६/२७/१०

आज खूप वर्षांनी मराठी नाटक पाहायचा योग आला. युएसमध्ये मराठी नाटक पाहायला मिळणं हे काहीसं दुर्मिळच. मराठी नाटकं एकतर खूप कमी वेळा इकडे येतात. त्यामुळे मिस करणं शक्यच नव्हतं. नाटक होतं, “ती”. “ती” ऐकल्यावर नाटक स्त्रीला केंद्रबिंदू ठेवून केलेलं असणार हे उघड होतं. ग्रुपमधल्या मैत्रिणींनी एकत्र जाऊन नाटक पाहायचं ठरवलं.

 ”ती”, ...

पुन्हा पावसालाच सांगायचे शनिवार, २६ जून २०१०, ०४:२३ (+०५:३०)

encounters with reality शब्दवेल

हि शेवटचीच रात्र. ते दूर शहराचे दिवे चमचमतायेत. पाउस पडतोय, कधीच, आणि धारांच्या पडद्याआड दूरवर पसरलेलं हे शहर. पण हे माझं गाव नाही ग. मी ओळखत नाही इथे कोणाला. रस्त्यातून चालताना शोधत चालतो, तुझा चेहेरा, तुझ्या चेहेर्यावर माझ्यासाठी असणारी ओळख. तू खरंच ओळखतेस ना मला? मला प्रश्न पडतो हा आजकाल, म्हणजे इथे एक पक्षी मरून पडलेला काल, आणि मग झाडावर उगाच कल्लोळ होता कोणीतरी हरवल्याचा. ...

केव्हातरी गुरुवार, २४ जून २०१०, १६:४७ (+०५:३०)

encounters with reality शब्दवेल

एकमेकांना ऐकवत होतो थेंबांचे आवाज
तुझ्या माझ्यातल्या अंतरात पावसाची धून होती
केव्हातरी तो थांबणार होताच बरसायचा
केव्हातरी ओल्या मातीतल्या खुणा पुसायाच्याच होत्या

ब्लॉगबाळाचा पहिला वाढदिवस सोमवार, २१ जून २०१०, १४:०८ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

माझा ब्लॉगबाळ एक वर्षांचा झाला. कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही. सुरवातीला सावकाश चालणारे बाळ आता दुडूदुडू धावते आहे. ब्लॉगबाळ सुरवातीचे बोबडे बोल बघितले की हसू येते. ब्लॉगबाळामुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले. ब्लॉगबाळाच्या जन्माआधी जीवन खुपचं कंटाळवाणे वाटायचे. आपल कोणीच नाही. आणि समजून घेणारे देखील कोणीच नाही. अस वाटायचं. खूप रागही यायचा आणि भीतीही खूप वाटायची. पण ...

संकेत बुधवार, १६ जून २०१०, १९:०१ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी ...

आवेग आणि निराशा शुक्रवार, ११ जून २०१०, १८:२७ (+०५:३०)

आल्हाद alias Alhad आल्हादक प्रतिबिंब!

आवेग आणि निराशा
यांचं नातं काय?

जोर, कष्ट, आनंद
शारिरीक मर्यादा आणि
भावना, अपेक्षा, उद्देश
यांचं नातं काय?

वार्‍यावर उधळणार्‍या घोड्याचं
वेगाचं आणि अपघाताचं
प्रमाण, संबंध, उपयोग
यांचं नातं काय?

ती, तिचं प्रेम
तिचं शरीर आणि स्वत्वाचं
मी आणि माझं भविष्य
यांचं नातं काय?

पलंग, ...

वाढदिवस शनिवार, १३ मार्च २०१०, ०१:३४ (+०५:३०)

हेमंत आठल्ये हेमंत आठल्ये

काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. ...