देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वाढदिवस

२र्‍या वाढदिवसानिमित्त 2know.in तर्फे छ... गुरुवार, २२ डिसेंबर २०११, १२:१७ (+०५:३०)

Rohan Jagtap 2know.in

१० जानेवारी २०१० रोजी मी माझा 2know.in हा ब्लॉग सुरु केला आणि बघता बघता लवकरच आता त्याला २ वर्ष पूर्ण होत आहेत. या २ वर्षांच्या प्रवासादरम्यान 2know.in ला मराठी वाचकांचं भरभरुन प्रेम मिळालं, पुरस्कार मिळाला, आणि हा सारा प्रवास सकारात्मक, आनंदमयी होऊन गेला.
2know.in मार्फत आपण वाचकांसाठी इतरही काही उपक्रम ...

दुसरा वाढदिवस शुक्रवार, १८ नोव्हेंबर २०११, १५:०७ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

गेलं वर्ष इतक्या लवकर कसं गेलं कळलंच नाही आणि हे असं दरवर्षी होतं. नव्या वर्षी, वाढदिवशी, सणासुदीला मागे वळून पाहिलं तर गेल्या वर्षीच्या घटना अगदी ताज्या वाटतात. यंदा अभ्यासात, कामात जरा जास्त बिझी झाल्याने ब्लॉगकडे दुर्लक्ष झाले खरे ( ते नेहमीच होत राहील बहुधा ) पण म्हणून वाढदिवस विसरून चालणार नाही.
तसं दुसऱ्या वाढदिवसाचं पहिल्या ...

सत्य-आभास, वाढदिवस शनिवार, १३ ऑगस्ट २०११, २२:२४ (+०५:३०)

Rohan Jagtap कथा ना व्यथा

काल मी गावाला गेलो होतो, आणि आज परत आलो. जग खूपच छोटं आहे, याप्रमाणे जवळपास सर्व मित्रांची अनपेक्षीत भेट झाली. अनपेक्षीत अशासाठी की, तेही दुसर्‍या गावाला असतात आणि मला माहित नव्हतं की, ते आजच येणार आहेत. जाताना बसमध्ये मला लिहिण्यासाठी खूप विषय सूचत होते. तसे ते प्रवासात असताना नेहमीच सूचत रहातात. प्रवासात असताना मन आपोआप जीवनाचा आढावा घेऊ लागतं. पण सध्या आत्ता या ओळी ...

दोन वर्ष – तीन पावसाळे … रविवार, ०३ जुलै २०११, ११:०२ (+०५:३०)

देवेंद्र चुरी दवबिंदू

दवबिंदु…ज्याला स्वत:च अस अस्तीत्व नसते…जीवन मिळते तेही क्षणभंगुर…तरीही तो असेपर्यंत चैतन्याची उधळणच करत असतो…आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक क्षणाला तो आनंद वाटत असतो…आकाशातील इंद्रधनुला साद ...

जिसने हमको हसना सिखाया! शुक्रवार, १५ एप्रिल २०११, १७:५८ (+०५:३०)

आदित्य चंद्रशेखर Aadityawrites

असं म्हणतात की मासा आणि विदुषक हे जगातले सगळ्यात दु:खी जीव आहेत. कारण पाण्यात असल्यामुळे माशाचे अश्रू कुणाला दिसू शकत नाहीत. विदुषकाचं पण तसंच! आत कितीही आक्रंदणारं मन असलं तरीही मुखवटा कायम हसरा ठेवावा लागतो. आपण सगळे सर्कशीतल्या विदुषकावर हसतो. त्याच्या एन्ट्रीलाच हसू फुटतं. ९९% वेळेस ते हसू त्याच्या व्यंगावर असतं. स्वत:च्या व्यंगाची अशी जाहीर खिल्ली उडू देणं याला तितकंच ...

वाढदिवस…… शनिवार, ०५ मार्च २०११, ०९:१२ (+०५:३०)

sahajach Sahajach's Blog

होता होता ब्लॉगला दोन वर्ष पुर्ण झालीत…

गेल्या वर्षी ’वाढदिवसाची’ पोस्ट टाकली तेव्हाच म्हटल्याप्रमाणे ….

खरं तर माझा आरंभशुर स्वभाव पहाता हा ब्लॉग गेले एक वर्ष टिकाव धरून आहे याचेच मला कधी कधी आश्चर्य़ वाटते. पण एक खरेय की अधून मधून मला येणारे कंटाळ्याचे लहानमोठे झटके वगळता ब्लॉगाची तब्येत ठीकच किंवा उत्तमच आहे म्हणावी लागेल.

ता वर्षीही तेच म्हणावेसे वाटतेय ...

माझा वाढ दिवस मंगळवार, १५ फेब्रुवारी २०११, ०९:४३ (+०५:३०)

RAVINDRA माझ्या मना ...

मित्रांनो आज माझा खरा खुरा वाढ दिवस! गम्मत वाटली न! अशीच परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळी आई वडील सुशिक्षित नसल्याने मुलांचे वाढ दिवस लक्षात ठेवत नसत. किंवा माहित नसत. इंग्रजी तारखांचे तर शक्यच नाही. त्यांची पंचाईत होत असे शाळेत नाव घालायच्या वेळी.( नशीब आपले शाळेत नाव घातले म्हणून आज येथवर येऊन पोहोचलो ) शिक्षकांनी जन्म तारीख विचारली कि त त प प व्हायची. मग काही तरी सांगून टाकायचे ...

नाव तिचं शामी.... मंगळवार, १५ फेब्रुवारी २०११, ०८:२३ (+०५:३०)

Vikrant Deshmukh... Toss The Feathers..........

नाव तिचं शामी. जराशी वेडी आहे ती, अवखळ स्वप्नांच्या बाबत......एरव्ही तिच्या संदूकीमध्ये कायम राखून ठेवलेली समंजसपणाची शाल ती पांघरतेच पण एखादा उत्कट प्रसंग आला की शामीची स्वप्ने हृदयातून गळ्यात, ...

पहिला वाढदिवस सोमवार, २२ नोव्हेंबर २०१०, २०:२१ (+०५:३०)

Sagar Kokne माझ्या मनातले काही

मनात येईल ते लिहीत जाणे हा तसा माझ्यासाठी काही नवीन उद्योग नाही. पण आपले लेखन कुठेतरी छापून येईल किंवा ते इतर अनोळखी वाचकांकडून वाचले जाईल आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छाही मिळतील असे काही वाटले नव्हते.पण ते झाले ते या ब्लॉगविश्वामुळे आणि 'माझ्या मनातले काही' लिहिता लिहिता एक वर्ष पूर्ण झाले.
शाळेत असताना निबंध लेखन हा माझा आवडता विषय असायचा. पण शाळा ...

देवीयों और सज्जनों…… सोमवार, ११ ऑक्टोबर २०१०, १०:५७ (+०५:३०)

sahajach Sahajach's Blog

’देवीयों और सज्जनो…..’  अनेक वर्षांनी हीच हाक पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे आजपासून…. ११ ऑक्टोबर , अमिताभचा वाढ्दिवस … ह्याच  दिवसाचे औचित्य साधून यावेळेस सोनीवर KBC पुन्हा एकदा सुरू होतेय!!! गेला दिड महिना सोनीवर ’कोई भी सवाल छोटा नही होता’ सांगणाऱ्या अमिताभच्या मस्त जाहिराती पहायला मिळाल्या……. नंतरच्या दिवसात अमिताभ स्वत: या कार्यक्रमासाठी तयार असल्याचे सांगत , प्रेक्षकांना ...