गेल्या महिन्यात नाटक मंडळींकडून धुरळा उडला कारण मंगेशकर कुटुंबियांना सध्या चालू असलेली नाटके काही आवडली नाहीत. तसे पाहायला गेलो तर मी देखील एक दोन वर्षात नाटक बघितले नसावे. शेवटले बघितलेले नाटक ’अवघा रंग एक झाला’ असावे. त्यावर एक टिपण टाकले असावे असे वाटते. ते नाटक तर आवडल्याचे आठवते. मुख्य कारण म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यसंगीत भरपूर होते. गाणारे ...