काय वाट्टेल ते...
कुठलाही रविवार असो, सकाळी उठलो, की आधी समोरचं दार उघडून कडीमधे अडकवलेले पेपर काढतॊ. अर्थात त्या मधे फक्त टाइम्स , मिरर आणि डिएनए असतो. मराठी पेपर पैकी एकही नसतो.नेहेमी प्रमाणे कुरुकुरत पेपर काढुन आत येतो..सौ. ला आवाज देतो, चहा कर गं….आवाजातला चिडखोर पणा ऐकुन तिला कल्पना आलेली असते….म्हणते… काय झालं? लोकसत्ता आला नाही वाटतं…….! म्हणत ती हलकेच स्मित हास्य देते.. ( काय ...